मसूदचा भाऊ रौफ अजगरचा खात्मा, जनाज्यात पाकिस्तानी सैन्याचे अधिकारी
जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरचा भाऊ पुलवामा हल्ला आणि कंदहार विमान अपहरणाचा मास्टरमाइंड रौफ अजगर याचा हिंदुस्थानच्या हवाई हल्ल्यात खात्मा झाला. त्याचा आज जनाजा निघाला. त्याच्यावर तिथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. रौफच्या जनाज्याला पाकिस्तानी सैन्याचे अधिकारी हजर होते. परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी पत्रकार परिषदेत हा फोटो दाखवला. दहशतवाद्यांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याची पाकिस्तानमध्ये पद्धत असावी, अशी तोफ परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी डागली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List