अधिक प्रमाणात प्रोटीन्स तुम्ही आहारात घेत असाल तर आजच थांबा.. वाचा सविस्तर

अधिक प्रमाणात प्रोटीन्स तुम्ही आहारात घेत असाल तर आजच थांबा.. वाचा सविस्तर

आपल्या आरोग्यासाठी अधिक प्रमाणात प्रथिने सेवन करणे हे धोकादायक मानले जाते. प्रथिनांशिवाय निरोगी शरीराची कल्पनाही करता येत नाही. प्रथिने हे आरोग्यासाठी आवश्यक असलेल्या पोषणांपैकी एक आहे. प्रथिने आपल्या स्नायूंच्या वाढीसाठी उत्तम मानली जातात. तसेच यामुळे आपले चयापचयही उत्तम राहते. परंतु जास्त प्रमाणात प्रथिने घेणे हे आपल्या आरोग्याशी खेळण्यासारखे आहे. हाडांसाठी प्रथिनांची आवश्यकता मोठ्या प्रमाणावर असते. तसेच प्रथिने आपली रोगप्रतिकारक शक्तीही वाढवण्यासाठी खूप महत्त्वाचे असतात.

सध्याच्या घडीला प्रोटीन्स घेण्याचा एक ट्रेंड आलेला आहे. खासकरून जीम करणाऱ्या व्यक्तींना प्रोटीन्स घेणं हे एक स्टेटस् सिम्बाॅल झालेलं आहे. प्रथिने आरोग्यासाठी आवश्यक आहेत, परंतु त्याचे जास्त सेवन हानिकारक ठरू शकते. योग्य प्रमाणात प्रथिने घेतल्याने शरीराला फायदा होतो आणि आजारांचा धोका कमी होतो. म्हणूनच वयानुसार आणि गरजेनुसार प्रथिने खाणं हे केव्हाही उत्तम.

अधिक प्रमाणामध्ये प्रथिने घेतल्यावर काय परिणाम होतात?

प्रथिनांचा अतिरेक झाल्यामुळे, कॅलरीज मोठ्या प्रमाणात वाढतात. याचा परिणाम वजन अधिक वाढण्याची शक्यता असते.

प्रथिने खाल्ल्याने मूत्रपिंडांवर दबाव वाढतो. शरीर अधिक प्रथिने पचवण्यात व्यस्त असते तेव्हा मूत्रपिंडांवर अतिरिक्त भार पडतो. यामुळे किडनी स्टोनचा धोका वाढू शकतो.

 

अधिक प्रमाणामध्ये प्रथिनांच्या सेवनामुळे रक्ताभिसरणावर परिणाम होतो. यामुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक सारख्या घातक आजारांचा धोका वाढतो.

 

अधिक प्रमाणामध्ये प्रथिनेयुक्त आहार घेतल्यामुळे हाडे हळूहळू कमकुवत होतात. गरजेपेक्षा जास्त प्रमाणात प्रथिने सेवन केल्याने शरीरातून कॅल्शियम बाहेर पडते. त्यामुळे ऑस्टियोपोरोसिस सारख्या हाडांशी संबंधित आजारांचा धोका वाढतो.

 

प्रथिनेयुक्त आहार अधिक प्रमाणात घेतल्याने बद्धकोष्ठता, पोट फुगणे आणि गॅस सारख्या समस्या उद्भवू शकतात. तसेच शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होऊ शकते. त्यामुळेच डिहायड्रेशनचा त्रासही होऊ शकते.

 

 

(कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Chagan Bhujbal : मनोज जरांगेंमुळे मराठा समाजाचं मोठं नुकसान, छगन भुजबळांनी पुन्हा काढले अस्त्र, त्या वक्तव्याने आता वाद पेटणार Chagan Bhujbal : मनोज जरांगेंमुळे मराठा समाजाचं मोठं नुकसान, छगन भुजबळांनी पुन्हा काढले अस्त्र, त्या वक्तव्याने आता वाद पेटणार
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यातील वाकयुद्धाची ठिणगी पडली आहे. छगन भुजबळ यांनी पहिली तोफ डागली आहे....
रणधीर सावरकरांनी गाजवले अर्थसंकल्पीय अधिवेशन, अकोल्याचे प्रश्न सरकारसमोर मांडले
बिग बॉस फेम अभिनेत्रीचा मोठा निर्णय; इंडस्ट्री सोडून या मार्गावर वाटचालीचा निर्णय
अवकाळी पाऊस-गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान, मात्र पंचनाम्याचे आदेश देण्यास सरकारला फुरसत नाही – विजय वडेट्टीवार
पुढच्या तीन चार तासांत उत्तर महाराष्ट्रात गारपीट, हवामान विभागाचा इशारा
Jalana News मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात आठ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू
पाकिस्तानी नागरिकाची पंजाब सीमेवरून हिंदुस्थानात घुसखोरी, बीएसएफने घेतले ताब्यात