“माझा पती माझ्या सर्व मैत्रिणींसोबत झोपलाय..” प्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा
‘बिग बॉस’मध्ये झळकलेली अभिनेत्री मंदाना करीमी तिच्या सौंदर्यामुळे आणि खासगी आयुष्यामुळे विशेष चर्चेत असते. मंदाना पडद्यावर जितकी लोकप्रिय होती, तितकंच तिचं वैवाहिक आयुष्य प्रकाशझोतात राहिलं. मंदानाने वयाच्या 27 व्या वर्षी बॉयफ्रेंड गौरव गुप्ताशी लग्न केलं होतं. परंतु लग्नाच्या सहा महिन्यांतच सर्वकाही बदललं. तिने लग्नानंतर सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप केले. इतकंच नव्हे तर पतीविषयीही धक्कादायक आरोप केले.
सहा महिन्यांत कौटुंबिक हिंसाचाराची केस
मंदाना करीमीने बॉयफ्रेंड गौरव गुप्ताशी 25 जानेवारी 2017 मध्ये कोर्ट मॅरेज केलं होतं. त्यानंतर दोघांनी मोजक्या कुटुंबीयांच्या आणि मित्रमैत्रिणींच्या उपस्थितीत हिंदू विवाहपद्धतीनुसार लग्नगाठ बांधली होती. परंतु लग्नाला अवघे सहा महिने होताच मंदानाने पती गौरव आणि तिच्या सासरच्या मंडळींवर कौटुंबिक हिंसाचाराचा आणि मानसिक छळाचा आरोप करत तक्रार दाखल केली होती. नंतर तिने ही केस मागेसुद्धा घेतली. अखेर चार वर्षांच्या संसारानंतर दोघांनी 2021 मध्ये घटस्फोट घेतला.
“माझ्या सर्व मैत्रिणींसोबत त्याचे संबंध”
‘लॉकअप’ या रिअॅलिटी शोमध्ये मंदानाने तिच्या पूर्व पतीबद्दल धक्कादायक खुलासे केले होते. “मी ज्या-ज्या मुलींना ओळखत होती, त्या सर्वांसोबत त्याचे शारीरिक संबंध होते. माझ्या सर्व मैत्रिणींसोबत त्याचे संबंध होते. घटस्फोटाआधी आम्ही चार वर्षे वेगवेगळे राहिलो, तेव्हा त्याने एकदाही मला संपर्क करण्याचा प्रयत्न केला नाही. इतकंच नव्हे तर त्यादरम्यान तो असं वागला, जसं की मी अस्तित्वातच नाही”, असं ती म्हणाली.
सासरच्या मंडळींकडून छळ
लग्नानंतर सासरच्या मंडळींकडूनही खूप छळ झाल्याचा आरोप मंदानाने केला. “सुरुवातीला तर ते मला काही बोलायचे नाही. परंतु नंतर हळूहळू त्यांनी मला बळजबरीने मंदिरात पूजा करायला भाग पाडलं. ते मला कुर्ता-पायजमा घालण्यास सांगायचे. त्यांनी माझ्याव अभिनयक्षेत्र सोडण्यासही दबाव टाकला होता”, असे आरोप तिने केले आहेत. इतकंच नव्हे तर लग्नासाठी त्यांनी धर्मपरिवर्तन केल्याचाही खुलासा मंदानाने या शोमध्ये केला होता.
मंदाना ही इराणियन अभिनेत्री असून ती भारतात काम करते. ‘भाग जॉनी’ या चित्रपटात तिने मुख्य भूमिका साकारली होती. ‘बिग बॉस’च्या नवव्या पर्वात ती स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. या शोमध्ये ती सेकंड रनरअप म्हणजेच तिसरा क्रमांक पटकावला होता. मंदानाचा जन्म मुस्लीम कुटुंबात झाला असून तिची आई भारतीय आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List