घटस्फोटाच्या 2 महिन्यांनंतर ‘भाबी जी घर पर हैं’ फेम अभिनेत्रीच्या पूर्व पतीचं निधन, मृत्यूचं कारण समोर

घटस्फोटाच्या 2 महिन्यांनंतर ‘भाबी जी घर पर हैं’ फेम अभिनेत्रीच्या पूर्व पतीचं निधन, मृत्यूचं कारण समोर

Shubhangi Atre Ex-Husband passed away: ‘भाभी जी घर पर है’ फेम अभिनेत्री शुभांगी अत्रे हिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शुभांगीचा पूर्व पती पियुष पुरी याचं निधन झालं आहे. 19 एप्रिल रोजी अभिनेत्रीच्या पतीने अखेरचा श्वास घेतला आहे. घटस्फोटाच्या 2 महिन्यांनंतर पियुष याने अखेरचा श्वास घेतला. लग्नाच्या 22 वर्षांनंतर शुभांगी आणि पियुष यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. 2003 मध्ये त्यांचं लग्न झालं होतं. तर 5 फेब्रुवारी 2025 दोघांनी घटस्फोटाची अधिकृत घोषणा केली.

पियुष यांच्या निधनाचं कारण देखील समोर आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून तो गंभीर आजाराने त्रस्त होता. सिरोसिस या गंभीर आजारावर रुग्णालयात उपचार सुरु असताना पियुष याने अखेरचा श्वास घेतला. पूर्व पतीच्या निधनानंतर अभिनेत्री दुःख देखील व्यक्त केलं.

अभिनेत्री म्हणाली, ‘या कठीण काळात तुमची सहानुभूती माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. याबद्दल बोलण्यासाठी तुम्ही मला थोडा वेळ द्यावा अशी माझी इच्छा आहे….’ एवढंच नाही तर, शुभांगी आणि पियूष यांच्यामधील संवाद देखील बंद झालेला होतं. अखेर पूर्व पतीच्या निधनानंतर स्वतःला सावरत अभिनेत्रीने पुन्हा कामाला सुरुवात केली आहे.

घटस्फोटाबद्दल काय म्हणाली होती शुभांगी?

खासगी आयुष्याबद्दल अभिनेत्री म्हणाली होती, ‘ते खूप वेदनादायक होतं. मी माझ्या नात्याला सर्वस्व दिलं. कालांतराने, पियुष आणि माझ्यात मतभेद निर्माण झाले. पण, आता मी त्या लग्नातून बाहेर पडली आहे आणि मला चांगलं वाटतंय, जणू काही माझ्या मनातून एक जड ओझं उतरलं आहे…. अशी भावना आता माझ्या मनात आहे… आता मला माझ्या मुलीवर पूर्ण लक्ष द्यायचं आहे… मला माझ्या मुलीला चांगलं आयुष्य द्यायचं आहे…’

पुढे अभिनेत्री म्हणाली होती, ‘गेल्या वर्षभरापासून आम्ही वेगळे राहत आहोत. पियुष आणि मी आमचं लग्न वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. परस्पर आदर, विश्वास आणि मैत्री हे मजबूत विवाहाचा पाया आहेत. पण, आम्हाला जाणवलं की आपण आपले मतभेद दूर करु शकतो.’ असं देखील अभिनेत्री म्हणाली होती.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

दहशतवादाविरोधातल्या लढाईत आमचा हिंदुस्थानला पूर्ण पाठिंबा, अमेरिकन संसदेच्या अध्यक्षांची घोषणा दहशतवादाविरोधातल्या लढाईत आमचा हिंदुस्थानला पूर्ण पाठिंबा, अमेरिकन संसदेच्या अध्यक्षांची घोषणा
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थानाला दहशतवादाविरुद्ध जगभरातून पाठिंबा मिळत आहे. आता अमेरिकेनेही हिंदुस्थानाला...
Mockdrill साठी सिव्हिल डिफेन्सचे दहा हजार स्वयंसेवक महाराष्ट्रात दाखल
VIDEO छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर मॉकड्रीलचा सराव
Pahalgam Attack – अशी शिक्षा करा की, कोणीही हिंदुस्थानकडे डोळे वर करून पाहण्याची हिंमत करणार नाही – राहुल गांधी
मधुमेही रुग्णांसाठी ही फळे आहेत सर्वात उत्तम, वाचा सविस्तर
केसांच्या वाढीसाठी आवळा खाणं आहे खूप गरजेचे, वाचा सविस्तर
Chagan Bhujbal : मनोज जरांगेंमुळे मराठा समाजाचं मोठं नुकसान, छगन भुजबळांनी पुन्हा काढले अस्त्र, त्या वक्तव्याने आता वाद पेटणार