प्रसिद्ध अभिनेत्याचं दोन अभिनेत्रींसोबत अफेअर चर्चेत; ब्रेकअपनंतर केलं त्याच्यापेक्षा 14 वर्षांनी लहान मुलीशी लग्न
बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत जे त्यांच्या पत्नींपेक्षा अनेक वर्षांनी मोठे आहेत. जसे धर्मेंद्र त्यांची दुसरी पत्नी हेमा मालिनीपेक्षा 13 वर्षांनी मोठे आहेत, सैफ अली खान त्यांची पत्नी करीना कपूर खानपेक्षा 10 वर्षांनी मोठा आहे,तर संजय दत्त मान्यता दत्तपेक्षा 19 वर्षांनी मोठा आहे. असाच एक अभिनेता आहे जो आज बॉलिवूडचा टॉपचा अभिनेता आहे. त्याच्या अभिनयासोबतच त्याचा देखणेपणा चाहत्यांना भूरळ घालतो.
दोन अभिनेत्रींसोबतचे अफेअर पण…
या बॉलिवूड अभिनेत्याने अनेक उत्तम चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांच्या एका चित्रपटाने 572 कोटी रुपये कमावले होते. पण या अभिनेत्याचे वैयक्तिक आयुष्यही तेवढेच चर्चेत राहिलं आहे. त्याचे तसे अनेक अभिनेत्रींसोबत नाव जोडलं आहे. पण त्याचे दोन अभिनेत्रींसोबतचे अफेअर जास्त चर्चेत राहिलं. मात्र दोन्ही नात्यांमध्ये त्याला यश मिळालं नाही. अखेर ब्रेकअपनंतर त्याच्यापेक्षा 14 वर्षांनी लहान मुलीशी लग्न केलं. हा अभिनेता म्हणजे शाहिद कपूर.
अखेर 14 वर्षांनी लहान मुलीसोबत अरेंज मॅरेज पद्धतीने लग्न
शाहिद कपूरचे नाव एकेकाळी करीना कपूर खानसोबत चर्चेत होते. दोघांमधील अफेअरने बरीच बातमी दिली, पण लवकरच हे नाते संपुष्टात आले. यानंतर शाहिदचे नाव प्रियांका चोप्रासोबत जोडले गेले, परंतु हे नातेही कोणत्याही टप्प्यावर पोहोचू शकले नाही. यानंतर मीरा राजपूत शाहिदच्या आयुष्यात आली. शाहिद कपूर आणि मीरा यांचे 2015 मध्ये अरेंज मॅरेज झाले होते. शाहिद आणि मीरा यांच्या वयात 14 वर्षांचा फरक आहे. लग्नाच्या वेळी, शाहिद 35 वर्षांचा होता, तर मीरा फक्त 21 वर्षांची होती. लवकरच त्यांच्या लग्नाला 10 वर्षे पूर्ण होतील. हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडप्यांमध्ये आता त्यांची गणना केली जाते. शाहिद आणि मीरा यांना एक मीशा नावाची मुलगी आणि झैन नावाचा मुलगा आहे.
शाहिद गेल्या जवळजवळ 20 वर्षांपासून बॉलिवूडमध्ये काम करत आहे आणि अनेक उत्तम चित्रपटांचा भाग आहे. त्याच्या ‘कबीर सिंग’ चित्रपटाने तर बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता.चित्रपटाने 380 कोटी रुपये कमावले होते. तर ‘पद्मावत’ने जगभरात 572 कोटी रुपये कमावले होते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List