हिंदुस्थानचे लष्करी सामर्थ्य मजबूत, चीनकडे सर्वाधिक सैन्यबळ

हिंदुस्थानचे लष्करी सामर्थ्य मजबूत, चीनकडे सर्वाधिक सैन्यबळ

जागतिक पातळीवरील अस्थिरता आणि तंत्रज्ञानात वेगाने होत असलेले बदल या पार्श्वभूमीवर अनेक देश संरक्षण धोरणाकडे लक्ष देत आहेत. लष्करी बजेट वाढवणे आणि सैन्याची कुमक वाढवणे असे अनेक मार्ग स्वीकारले जात आहेत. ग्लोबल फायरपॉवरने सर्वाधिक लष्करी सामर्थ्य असलेल्या टॉप 10 देशांची यादी जाहीर केलेय. या माहितीनुसार, चीनकडे 20 लाख 35 हजार सक्रिय सैनिकी मनुष्यबळ असून सर्वाधिक सैन्य असलेला चीन प्रथम क्रमाकांचा देश आहे. या यादीत हिंदुस्थान दुसऱ्या क्रमाकांवर आहे.

हिंदुस्थानकडे 14 लाख 55 हजार 550 इतके सक्रिय लष्करी मनुष्यबळ आहे. दक्षिण आशियात बळकट संरक्षण क्षमतेचे प्रदर्शन हिंदुस्थानकडून होत आहे. अमेरिका तिसऱ्या स्थानावर असून त्यांच्याकडे 13 लाख 28 हजार सक्रिय सैन्य आहे. अमेरिकेने तंत्रज्ञानावर आधारित लष्करी गुंतवणूक केली असल्यामुळे सक्रिय सैन्याचा आकडा थोडा कमी केला आहे, तर पाश्चिमात्य देशांपैकी युक्रेन आणि रशियाने 2022 नंतर सक्रिय सैन्यांच्या संख्येत वाढ केली आहे.

स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटच्या ताज्या आकडेवारीनुसार, शीतयुद्धाचा शेवट झाल्यानंतर जागतिक स्तरावर लष्कराच्या खर्चात वाढ करण्यास सुरुवात झाली. मागच्या वर्षी हा खर्च एकूण 2.718 ट्रिलियन डॉलर्सवर पोहोचला. 2023 च्या तुलनेत यात 9.4 टक्क्यांची वाढ आहे.

पाकिस्तानचा नंबर सातवा

लष्करी सामर्थ्याबाबत टॉप 10 देश म्हणजे चीन, हिंदुस्थान, अमेरिका, उत्तर कोरिया, रशिया, युक्रेन, पाकिस्तान, इराण, दक्षिण कोरिया, व्हिएतनाम. या यादीत पाकिस्तानचा क्रमांक सातवा आहे. पाकिस्तानकडे 6 लाख 54 हजार इतके सक्रिय मनुष्यबळ आहे. छोटा देश असलेल्या व्हिएतनामध्ये सहा लाख इतके लष्करी मनुष्यबळ आहे. 2022 साली व्हिएतनामकडे 4 लाख 70 हजार इतके सैन्य होते. तीन वर्षांत या देशाने लष्करी सामर्थ्य जास्त वाढवले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

भजन, आरती, हवन; अंबानी कुटुंबाने गंगा काठावर चक्क मृत पाळीव कुत्र्यासाठी घातली मोठी पूजा भजन, आरती, हवन; अंबानी कुटुंबाने गंगा काठावर चक्क मृत पाळीव कुत्र्यासाठी घातली मोठी पूजा
उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचे संपूर्ण कुटुंब नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतं. विशेषतः अंबानी महिलांची तर...
‘PAK आर्मीने आमच्या देशाला उद्ध्वस्त केलं’; अदनान सामीसमोर पाकिस्तानी मुलांनी बोलून दाखवली खदखद
भारतातील सर्वात महागडा मराठमोळा टीव्ही अभिनेता; एका दिवसाचे घेतो चक्क 3.50 लाख, 8 वर्षानंतर जोरदार कमबॅक
‘इंडियन आयडॉल 12’चा विजेता पवनदीप राजनचा भीषण अपघात; व्हिडीओ समोर
माझ्या शरीराचा वाईट उपयोग…, वन-नाईट स्टँडबद्दल अभिनेत्रीचं मोठं वक्तव्य
अ‍ॅव्होकॅडो व्यतिरिक्त ‘हे’ 5 सुपरफूड्स जे कोलेजन वाढविण्यास करतील मदत
Photo – ‘गोदावरी’ची दुर्दशा… जीवनदायिनी गोदावरीला प्रदूषणमुक्तीची प्रतिक्षा!