चारकोपमध्ये आग नियंत्रणासाठी शिवसैनिक धावले, चाळीतील रहिवाशांना सुरक्षित बाहेर काढले

चारकोपमध्ये आग नियंत्रणासाठी शिवसैनिक धावले, चाळीतील रहिवाशांना सुरक्षित बाहेर काढले

चारकोपच्या एकतानगरमध्ये शनिवारी रात्री दुकानाला लागलेल्या आगीत शिवसैनिक मदतीला धावले. शिवसैनिकांनी चाळीतील सर्व रहिवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढले तसेच तातडीने सर्व वीज यंत्रणा बंद करून आगीचा भडका उडेल असे घरगुती गॅस सिलिंडर्स बाहेर काढले. आधीच संपर्क करण्यात आलेल्या पोलीस आणि अग्निशमन यंत्रणांना तातडीने आगीवर नियंत्रण मिळवले. शिवसैनिकांच्या या प्रसंगावधानाने पुढील मोठा अनर्थ टळला.

एकतानगरमध्ये दुकानाला आग लागल्याची माहिती कळताच शाखाप्रमुख विजय मालुसरे हे शाखा क्रमांक 20 आणि 21 मधील सर्व शिवसैनिकांसह घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तातडीने पोलीस, अदानी वीज कंपनीचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाला संपर्क करून एकमजली चाळीतील दुकानाला लागलेल्या आगीची माहिती दिली. पोलीस, अग्निशमन अधिकारी येईपर्यंत त्यांनी चाळीतील सर्व रहिवाशांना सुरक्षितपणे घराबाहेर काढले तसेच चाळीची वीज यंत्रणा आणि त्याचबरोबर प्रत्येकाच्या घरातील गॅसचे सिलिंडर्स बाहेर काढण्यास मदत केली.

यावेळी विधानसभा समन्वयक अभिषेक दळवी, विधानसभा संघटक राजन निकम, उपविभागप्रमुख श्याम मोरे, विधानसभा निरीक्षक अभिषेक शिर्के यांच्यासह शाखा क्र 20 आणि 21 मधील पदाधिकाऱ्यांनी मदतीसाठी पुढाकार घेतला. काही मिनिटांत घटनास्थळी पोहोचलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आग नियंत्रणात आणली. त्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;