खऱ्या शाहरूखपेक्षा डुप्लिकेट शाहरूखचा थाट पाहाच; चाहत्यांची तुफान गर्दी,बॉडीगार्डही हैराण

खऱ्या शाहरूखपेक्षा डुप्लिकेट शाहरूखचा थाट पाहाच; चाहत्यांची तुफान गर्दी,बॉडीगार्डही हैराण

बॉलिवूडमधील आपला आवडता सेलिब्रिटी दिसला किंवा तो कोणत्या ठिकाणी पोहोचणार आहे याची माहिती जेव्हा चाहत्यांना समजते तेव्हा ते आपल्या आवडत्या सेलिब्रिटीची एक झलक पाहण्यासाठी तोबा गर्दी करतात. त्यात असेही काही कलाकार आहेत ज्यांना पाहण्यासाठी तर चाहते अगदी काहीही करू शकतात. जसं की अमिताभ बच्चन, सलमान खान आणि यातील अजून एक नाव म्हणजे बॉलिवूडचा बादशाह शाहरूख खान.

हुबेहूब शाहरूख 

जर शाहरुख खान कोणत्याही ठिकाणी येणार असेल तर त्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी जमते. चाहते त्याची एक झलक पाहण्यासाठी उत्सुक असतात. पण शाहरुखचे चाहते फक्त त्याला पाहायला येत नाहीत तर त्याच्यासारखं दिसण्याचा प्रयत्नही करतात. असाच एक शाहरूखचा चाहता आहे. जो हुबेहूब त्याच्यासारखाच दिसतो. त्याने अगदी त्याच्यासारखाच लूक केलेला आहे. तेच मोठे केस आणि चष्मा. जे पाहून कोणीही फसेल. निळ्या रंगाचा जॅकेट, पांढरा टी-शर्ट आणि गडद रंगाच्या जीन्समधील हा माणूस खरोखर शाहरुख खानसारखा दिसतो.

डुप्लिकेट शाहरुख खानला पाहण्यासाठी चाहत्यांची तोबा गर्दी 

आश्चर्याची गोष्ट म्हणजे शाहरुख खानला पाहण्यासाठी जेवढी गर्दी जमते तेवढीच गर्दी या डुप्लिकेट शाहरूखला पाहण्यासाठी जमली आहे. त्याचा एक व्हिडिओही व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये चाहते या डुप्लिकेट शाहरुख खानला पाहण्यासाठी वेडे झालेले दिसत आहेत. त्याच्या बॉडीगार्डसनाही त्या गर्दीला रोखने कठीण झाले होते.


चाहत्यांची चक्क धक्काबुक्की अन्…

या डुप्लिकेट शाहरूखचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. जे सिने हब नावाच्या ट्विटर हँडलवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये लोकांची तोबा गर्दी दिसत आहे. तर त्याचे अंगरक्षक गर्दी नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण ही गर्दी नियंत्रणा बाहेर जात असल्याचं दिसत आहे. एवढंच नाही तर, बरेच लोक त्याला पाहण्यासाठी गाडीवर चढत आहेत,तसेच चाहत्यांमध्ये चक्क धक्काबुक्कीही दिसत आहे. प्रत्येकजण या डुप्लिकेट शाहरुख खानची झलक पाहण्याचा प्रयत्न करत आहे.

हा डुप्लिकेट शाहरुख खान कोण आहे?

या डुप्लिकेट शाहरुख खानचे नाव इब्राहिम कादरी आहे. ज्याने डुप्लिकेट शाहरुख खान म्हणून खूप प्रसिद्धी मिळवली आहे. इब्राहिम कादरी सोशल मीडियावर डुप्लिकेट शाहरुख म्हणून प्रसिद्ध आहे. याशिवाय तो शाहरुख खान म्हणून कार्यक्रमांमध्येही सहभाग घेत असतो.या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या भरभरून कमेंट्स येत आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;