हत्येप्रकरणी महिलेला अटक

हत्येप्रकरणी महिलेला अटक

दर्ग्याच्या  मालकी हक्काच्या वादातून शाकीर अली शेखची हत्या झाली होती. शेखच्या हत्येप्रकरणी एका महिलेला वांद्रे पोलिसांनी अटक केली. परवीन जाकीर अली शेख असे तिचे नाव आहे. तसेच एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन त्याची रवानगी बालगृहात केली आहे.

अफजल अली हा त्याच्या कुटुंबीयांसोबत वांद्रे येथे राहतो. त्याच परिसरात राहणाऱ्या इम्रानसह इतर आरोपीचा दर्ग्याच्या मालकीविरुद्ध वाद सुरू होता. 11 एप्रिलला दर्ग्याच्या मालकी हक्कावरून वाद झाला. त्यानंतर अफजलचे चुलतभाऊ शाकीर अलीला जीवे ठार मारण्याची धमकी दिली. चौघांनी केलेल्या मारहाणीत शाकीर अली हे जखमी झाले. अफजलने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद केला. गुन्हा नोंद होताच पोलिसांनी चौघांना अटक केली.  ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. या गुह्यात परवीनचा सहभाग असल्याचे उघड झाले. पोलिसांनी परवीनला ताब्यात घेऊन अटक केली. तसेच एका अल्पवयीन मुलाला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याची रवानगी बालगृहात केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;