हिंदुस्थानचा दुसरा वॉटर स्ट्राईक, बगलिहार धरणाचे पाणी रोखले

हिंदुस्थानचा दुसरा वॉटर स्ट्राईक, बगलिहार धरणाचे पाणी रोखले

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थानने पाकिस्तानची चोहोबाजूंनी कोंडी केली आहे. सिंधू जलकरार रद्द करत पहिला मोठा धक्का दिला. त्यानंतर आता दुसरा वॉटर स्ट्राईक केला असून चिनाब नदीवरील बगलिहार धरणातून पाकिस्तानला जाणारा पाण्याचा प्रवाह रोखला आहे. तसेच झेलम नदीवरील किशनगंगा धरणाचेही पाणी थांबवण्याचा निर्णय घेण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत.

जम्मूतील रामबन येथील बगलिहार धरण आणि उत्तर कश्मीरमधील किशनगंगा धरणाद्वारे पाकिस्तानकडे जाणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाचे नियमन हिंदुस्थान करू शकतो. म्हणजेच या धरणांद्वारे पाकिस्तानला जाणारे पाणी कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय थांबवता येते किंवा प्रवाह वाढवता येतो. तरीही बागलिहार धरण हा दोन्ही देशांमधील दीर्घकाळापासून वादाचा विषय आहे. पाकिस्तानने यावर जागतिक बँकेकडून मध्यस्थीची मागणी केली होती. किशनगंगा धरणाचाही असाच वाद आहे.

– पाकिस्तान सिंधू नदीतील 93 टक्के पाणी सिंचन आणि वीजनिर्मितीसाठी वापरतो. पाकिस्तानची सुमारे 80 टक्के शेतजमीन आणि याच पाण्यावर अवलंबून आहे. शेती हा पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्यामुळे हिंदुस्थानने सिंधू करार रद्द करण्याचा निर्णय घेतल्यापासून पाकिस्तान सातत्याने युद्धाच्या धमक्या देत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;