माझ्या अस्थी गटारात विसर्जित करा! पुरुषांसाठीही कायदा असता तर… पत्नीच्या छळाला कंटाळून इंजिनियरनं जीवन संपवलं

माझ्या अस्थी गटारात विसर्जित करा! पुरुषांसाठीही कायदा असता तर… पत्नीच्या छळाला कंटाळून इंजिनियरनं जीवन संपवलं

पत्नीच्या छळाला कंटाळून पतीने आत्महत्या केल्याची आणखी एक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशमध्ये पत्नी आणि सासरच्यांच्या छळाला कंटाळून एका इंजिनियरने गळफास घेत जीवन संपवले आहे. मृत्युला कवटाळण्यापूर्वी त्याने पत्नी आणि तिच्या कुटुंबाकडून होणाऱ्या छळाची माहिती दिली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

मोहित कुमार असे आत्महत्या केलेल्या इंजिनियरचे नाव आहे. नोएडा येथील हॉटेलच्या खोलीमध्ये त्याने गळफास घेत जीवन संपवले. तत्पूर्वी रेकॉर्ड केलेल्या व्हिडीओमध्ये त्याने पत्नी आणि सासरच्यांकडून मानसिक छळ होत असल्याचा आरोप केला. आपली सर्व मालमत्ता पत्नी आणि सासरच्यांच्या नावावर करण्यासाठी माझा छळ केला जात होता. एवढेच नाही तर हुंड्याच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकीही दिली जात होती, असा आरोप मयत मोहित कुमारने केला.

तुम्हाला हा व्हिडीओ मिळेल तेव्हा मी हे जग सोडून गेलेलो असेन. जर पुरुषांसाठीही कायदा असता तर कदाचित मी हे पाऊल उचलले नसते. माझ्या पत्नी आणि तिच्या कुटुंबाकडून होत असलेला मानसिक छळ मला आता सहन होत नाही. माझ्या पत्नीला तिच्या आईने गर्भपात करायला लावला. तसेच तिचे सर्व दागिने आणि साड्याही स्वत:कडे ठेऊन घेतल्या. एवढेच नाहीतर मला धमकीही देण्यात आली की, घर आणि मालमत्ता पत्नीच्या नावे केली नाही तर माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर हुंड्याचा खोटा गुन्हा दाखल करू. माझ्या मृत्यूनंतरही मला न्याय मिळाला नाही तर माझ्या अस्थी गटारात विसर्जित करा. आई-बाबा कृपया मला माफ करा. मी तुमच्या अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही, असे मोहितने व्हिडीओमध्ये म्हटले. ‘इंडिया टूडे‘ने याबाबत वृत्त दिले आहे.

मोहित हा उत्तर प्रदेशमधील ओरैया जिल्ह्यातील रहिवासी होता. तो आणि त्याची पत्नी प्रिया यादव यांनी दीर्घ काळ प्रेमसंबंधात राहिल्यानंतर लग्न केले होते. प्रियाला बिहारच्या समस्तीपूरच्या प्राथमिक शाळेमध्ये शिक्षिकेची नोकरी मिळेपर्यंत सर्वकाही ठीक होत. मात्र नोकरी लागल्यानंतर तिच्या वागण्यात बदल झाला आणि भावाच्या सांगण्यावरून ती मोहितचा मानसिक छळ करू लागली, असा आरोप मोहितच्या कुटुंबाने केला.

मोहित हा नोएडातील एका सिमेंट कंपनीमध्ये काम करत होता आणि तिथेच त्याची प्रियाशी ओळख झाली होती. लग्नापूर्वी सात वर्ष त्यांचे प्रेसंबंध होते. लग्नानंतर पहिले तीन महिने सर्व सुरळीत होते, मात्र त्यानंतर प्रियाने त्याचा छळ करण्यास सुरुवात केली. खोटे खटले दाखल करण्याची भीती दाखवून मालमत्ता नावावर करण्याचा दबाव टाकला. याच दबावाखाली भावाने आत्महत्या केल्याचा आरोप मोहितचा भाऊ तरण प्रतापने केला.

दरम्यान, रेल्वे स्थानकाजवळील जॉली हॉटेलच्या खोली नंबर 105 मधून मोहितचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. पोलीस अधीक्षक नाथ त्रिपाठी यांनी याची पुष्टी केली आहे. रेल्वे स्थानकाजवळील हॉटेलमधून आम्हाला फोन केला होता. मोहित नावाचा व्यक्ती रुममधून बाहेर आला नसल्याने संशय व्यक्त करण्यात आला होता. आम्ही जाऊ दरवाजा उघडला असता तो गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. प्राथमिक दृष्ट्‍या ही आत्महत्या असल्याचे दिसून येत असून याबाबत त्याच्या कुटुंबाला कळवण्यात आले आहे, असे पोलिसांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘बाबनकुळे यांना लाज वाटली पाहिजे’ चंद्रशेखर बावनकुळे यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर संजय राऊत संतापले ‘बाबनकुळे यांना लाज वाटली पाहिजे’ चंद्रशेखर बावनकुळे यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर संजय राऊत संतापले
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्षातील कार्यकर्त्यांना कानमंत्र दिला. तुम्ही काँग्रेस पक्ष फोडा, रिकामा करा, असा संदेश बावनकुळे यांनी दिला....
अजित पवार यांना शरद पवार कधीच माफ करणार नाही…संजय राऊत यांनी असे का म्हटले?
पाकिस्तानचा उदो-उदो करणाऱ्या राखी सावंतला भारतातून हाकला; मनसे आक्रमक
“विविध ठिकाणी घेऊन जाऊन सतत..”; महिलेकडून एजाज खानवर बलात्काराचे आरोप, गुन्हा दाखल
‘देऊळ बंद’मधील चिमुकली आठवतेय? राघव शास्त्रीचा पासवर्ड गायब करणारी ‘ती’ आता दिसते अशी
इन्स्टाग्रामवरील मेसेजमुळे भवानीनगरमध्ये तरुणाचा खून, सोशल मीडियामुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली
HSC Result 2025 – बारावीचा निकाल जाहीर, यंदाही मुलींनी मारली बाजी; कोकण विभाग अव्वल, तर लातूर खालून पहिला