संजय राऊत यांनी घेतली शरद पवार यांची भेट, ‘नरकातील स्वर्ग’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाचे दिले निमंत्रण
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. तसेच संजय राऊत यांचे आगामी पुस्तक ‘नरकातील स्वर्ग’ या पुस्तक प्रकाशनाच्या समारंभाचे औपचारिक निमंत्रणही दिले.
एक्स वर पोस्ट करून शरद पवार म्हणाले की, राज्यसभेचे खासदार तसेच शिवसेनेचे नेते श्री. संजय राऊत यांनी आज माझ्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. या भेटीच्या वेळी त्यांनी आपल्या लेखणीतून साकारलेल्या ‘नरकातील स्वर्ग’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाचे औपचारिक निमंत्रण दिले.
या भेटीदरम्यान रोहन तावरे यांनी लिहिलेल्या वन्यजीवनावर आधारित पुस्तकावर सविस्तर चर्चा झाली. त्याचप्रमाणे, राज्य व देशातील विविध मुद्द्यांवरही विचारमंथन झाले. भेटीनंतर मी त्यांना त्यांच्या पुढील कार्यासाठी मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या असेही शरद पवार यांनी सांगितले.
राज्यसभेचे खासदार तसेच शिवसेनेचे नेते श्री. संजय राऊत यांनी आज माझ्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. या भेटीच्या वेळी त्यांनी आपल्या लेखणीतून साकारलेल्या ‘नरकातील स्वर्ग’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाचे औपचारिक निमंत्रण दिले.
या भेटीदरम्यान रोहन तावरे यांनी लिहिलेल्या… pic.twitter.com/yLclxGefxL
— Sharad Pawar (@PawarSpeaks) May 4, 2025
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List