रुद्राक्षाची माळ जपण्यावरून वाद धावत्या अवंतिका एक्प्रेसमध्ये ठाण्यातील महिलेवर मुस्लिम टोळक्याचा ब्लेडहल्ला
रुद्राक्षाची माळ जपते म्हणून ठाण्यातील अॅड. शीतल भोसले यांच्यावर मुंबईहून गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या धावत्या अवंतिका एक्स्प्रेसमध्ये मुस्लिम टोळक्याने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली.
आप यह रुद्राक्ष पहनते हो… सब बकवास है… असे हिणवत आणि भोसले यांच्या हातावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या टॅटूवरूनही अपशब्द वापरत मुस्लिम महिलेने आणि तिच्या साथीदारांनी बॅगमधून ब्लेड काढत भोसले यांच्यावर वार केले. यात गंभीर जखमी झालेल्या शीतल भोसले यांनी वापी स्टेशनवरील पोलिसांकडे मदतीसाठी टाहो पह्डण्यासाठी खिडकीतून हात बाहेर काढताच एका मुस्लिम तरुणाने त्यांना मागे खेचत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तसेच हल्लेखोरांनी सलवार खेचत त्यांना विवस्त्र्ा करण्याचाही प्रयत्न केला. हेल्पलाइनवर तक्रार केल्यानंतर याची गंभीर दखल घेत वलसाड रेल्वे पोलिसांनी अवंतिका एक्स्प्रेसमध्ये चढून हल्लेखोर महिलेसह दोघांना बेडय़ा ठोकल्या. दरम्यान या घटनेने ट्रेनमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. ठाणे येथे राहात असलेल्या अॅड. शीतल भोसले यांचा मुलगा इंदोर येथे शिक्षण घेत आहे. शाळेला सुट्टी पडल्याने त्याला आणण्यासाठी भोसले या 3 मे रोजी रात्री अवंतिका एक्स्प्रेसच्या सामान्य डब्यातून प्रवास करत होत्या. या डब्यात बहुतांश सहप्रवाशी अल्पसंख्याक होते. शेजारी बसलेल्या मुस्लिम महिलेने अपशब्द वापरल्यानंतर शीतल भोसले यांनी मी तुम्हाला तुमचा बुरखा बकवास आहे असे म्हणाले का? मग तुम्ही माझ्या माळेवरून का बोलता, असा सवाल केला. त्यावरून या महिलेने शीतल भोसले यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
कोणीही मदतीला धावून आले नाही
हल्लेखोर महिला जोरजोरात अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत शीतल भोसले यांना मारहाण करत होती. भोसले यांनी मदतीसाठी टाहो पह्डला, परंतु डब्यातील कोणीही मदतीला धावून आले नाही. उलट हल्लेखोर महिलेच्या बाजूने एक तर्राट मुस्लिम प्रवासी आला. त्याने माझे केस ओढत सीटवरून फरफटत खाली खेचले. खिशातील गाडीतील चावी माझ्या गळय़ाला लावून घुसड दुंगा, अशी धमकी दिल्याचे भोसले यांनी सांगितले. या तर्राट प्रवाशाने गुडघ्याने माझ्या डाव्या बरगडीवर मारत माझा विनयभंगही केला. तसेच माझ्या पर्समधील 1500 रुपये काढून घेतले. या झटापटीत माझ्या हातातील माझी सोन्याची अंगठी गहाळ झाल्याचा आरोपही शीतल भोसले यांनी केला आहे.
वलसाड पोलिसांनी शीतल भोसले यांना मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केले. तेथे उपचार केल्यानंतर दोन आरोपी व भोसले यांना आज सकाळी पालघर रेल्वे पोलीस ठाण्यात आणले. यावेळी गुन्हा दाखल करण्यात आला.
…तर मानच कापली गेली असती
सफाळे रेल्वे स्टेशन सोडल्यानंतर शीतल भोसले या प्रसाधनगृहात गेल्या, मात्र त्या परत आल्या असता हल्लेखोर महिला भोसले यांची बॅग उघडून त्यातील वस्तू फेकत असल्याचे दिसले. याबाबत त्यांनी विचारले असता हल्लेखोर महिलेने तू माझी पर्स चोरलीस, कुठे आहे सांग असे म्हणत शीतल भोसले यांच्यासोबत पुन्हा वाद घालण्यास सुरुवात केली, परंतु बॅगमध्ये काही न सापडल्याने तिने थेट भोसले यांचे कपडेच ओढण्याचा प्रयत्न करत सलवार खेचली. एवढेच नाहीतर ब्लेडने वार केले. सुदैवाने भोसले यांनी हे सर्व वार हातावर घेतले. अन्यथा या हल्ल्यात त्यांची मानच कापली गेली असती.
संतप्त नागरिकांची पोलीस ठाण्यावर धडक
या घटनेची माहिती कळताच अनेक सामाजिक संघटनांनी पोलीस ठाण्यावर धाव घेत आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली. नागरिकांच्या या रेटय़ामुळे पोलिसांना दोन पुरवणी फिर्याद नोंद करण्यास भाग पडले. यावेळी पोलीस ठाण्याच्या आवारात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List