भारत-पाकिस्तान वादादरम्यान अभिनेत्रीचा मोठा निर्णय; स्वत:च्याच चित्रपटाचे सर्व..

भारत-पाकिस्तान वादादरम्यान अभिनेत्रीचा मोठा निर्णय; स्वत:च्याच चित्रपटाचे सर्व..

जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सर्व पाकिस्तानी कलाकारांवर भारतात बंदी घातली आहे. इतकंच नव्हे तर पाकिस्तानी कलाकारांचे सोशल मीडिया अकाऊंट्ससुद्धा आता भारतात दिसत नाहीत. पहलगाम हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचे पुरावे समोर आल्यानंतर भारत सरकारकडून कठोर पावलं उचलली जात आहेत. अशातच एका बॉलिवूड अभिनेत्रीने मोठा निर्णय घेतला आहे. अभिनेत्री वाणी कपूरचा ‘अबीर गुलाल’ हा चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर होता. परंतु त्यात पाकिस्तानी कलाकार फवाद खानची मुख्य भूमिका असल्याने हा चित्रपट भारतात प्रदर्शित होणार नाही, असा निर्णय माहिती व प्रसारण मंत्रालयाकडून घेण्यात आला. त्यानंतर आता वाणीनेही महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे.

‘अबीर गुलाल’ या चित्रपटातून फवाद खान बॉलिवूडमध्ये पुनरागमन करण्यास सज्ज झाला होता. वाणी आणि फवादचा हा चित्रपट 9 मे रोजी प्रदर्शित होणार होता. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर त्याचं जोरदार प्रमोशन सुरू होतं. परंतु पहलगाम हल्ल्यानंतर वाणीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर फवाद आणि चित्रपटासंबंधीचे सर्व पोस्ट डिलिट केल्याचं समजतंय. वाणीच्या सोशल मीडिया अकाऊंटवर फवाद आणि तिच्या ‘अबीर गुलाल’ या चित्रपटासंदर्भातील कोणतीच पोस्ट दिसत नाही. यावरून असंही म्हटलं जातंय की फवाद खानचा इन्स्टाग्राम अकाऊंट भारतात बंद केल्यामुळे वाणीच्या अकाऊंटवरून ते पोस्ट आपोआप हटवले गेले आहेत.

‘अबीर गुलाल’ या चित्रपटातील ‘अंग्रेजी रंगरसिया’ आणि ‘खुदाया इश्क’ ही दोन गाणी युट्यूबवर प्रदर्शित करण्यात आली होती. परंतु आता ती गाणीसुद्धा युट्यूबवरून काढून टाकण्यात आली आहेत. ही गाणी ‘अ रिचर लेन्स एंटरटेन्मेंट’च्या अधिकृत चॅनलवरून आणि ‘सारेगम’च्या युट्यूब चॅनलवरूनही हटवण्यात आली आहेत.

वाणी कपूरने 22 एप्रिल रोजी सोशल मीडियावर ‘अबीर गुलाल’मधील एक गाणं पोस्ट केलं होतं. नंतर तिने त्याच दिवशी हे गाणं डिलिट केलं होतं. यानंतरही अनेकांनी तिला बॉयकॉट करण्याची मागणी केली होती. पहलगाम हल्ल्यानंतरही पाकिस्तानी कलाकारासोबतच्या चित्रपटाला ती कसं पाठिंबा देऊ शकते, असा सवाल नेटकऱ्यांनी केला होता. एकीकडे भारतात ‘अबीर गुलाल’च्या प्रदर्शनावर बंदी आणली, तर दुसरीकडे पाकिस्तानमध्येही हा चित्रपट प्रदर्शित होऊ दिला नाही. कारण त्यात भारतीय अभिनेत्री वाणीची भूमिका आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

IMD Weather update : महाराष्ट्रावर मुसळधार पावसापेक्षाही मोठं संकट; पुढील 5 दिवस धोक्याचे, आयएमडीचा हाय अलर्ट IMD Weather update : महाराष्ट्रावर मुसळधार पावसापेक्षाही मोठं संकट; पुढील 5 दिवस धोक्याचे, आयएमडीचा हाय अलर्ट
अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे, गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये पाऊस सुरूच आहे. दरम्यान आता पुन्हा एकदा...
खऱ्या शाहरूखपेक्षा डुप्लिकेट शाहरूखचा थाट पाहाच; चाहत्यांची तुफान गर्दी,बॉडीगार्डही हैराण
सिद्धार्थ जाधवची करामत भारी, परीक्षेला गेला अन् चित्र काढून आला, तरी 35 मार्क कसे मिळाले?
बारावीत नापास झालेले बॉलिवूड स्टार, पण कमावतात कोट्यवधींची माया
सीता – पार्वती यांच्या भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री खऱ्या आयुष्यात दिसतात गॅमरस, चौथ्या अभिनेत्रीला पाहून व्हाल थक्क
ब्रँडेड की लोकल कूलर? निर्णय घेण्याआधी हे नक्की वाचा!
superfoods for kids: उन्हाळ्यात मुलांना निरोगी ठेवण्यासाठी त्यांच्या आहारात ‘या’ 5 सुपरफूड्सचा समावेश करा…