कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली, दोघांचा मृत्यू

कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली,  दोघांचा मृत्यू

मुंबईहून कोकणात जाणाऱ्या खाजगी लक्झरी बसचा कर्नाळा खिंडीत अपघात होऊन बस उलटली. ही घटना रात्री 11 वाजण्याच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत बसखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे कळते तर  35 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

ओमकार ट्रॅव्हल्सची ही खाजगी बस मुंबईहून कोकणात प्रवासी घेऊन जात होती. चालकाचा ताबा सुटल्याने कर्नाळा खिंडी जवळ बस उलटून अपघात घडला. बस एका बाजूला उलटी झाल्याने बसमधील 35 प्रवासी आतच अडकून पडले. या दुर्घटनेत दोन गंभीर जखमी प्रवाशांचा मृत्यू आल्याचे सांगण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिकांकडून तातडीने मदतकार्य सुरू झाले. अपघातातील सर्व जखमींना तातडीने एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर मोठ्या प्रमाणात बचाव कार्य सुरू असल्याने मुंबई गोवा महामार्गावर दोन्ही बाजूला प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;