पहलगाम हल्ला, पोलिसांत तक्रार…, ‘त्या’ एका वक्तव्यामुळे सोनू निगमचं करीयर संकटात?
Pahalgam Terror Attack: गेल्या काही दिवसांपासून सोनू निगम वादाच्या भावऱ्यात अडकला आहे. कन्नड सिनेविश्वातील अनेक लोकं सोनू निगम विरोधात उभे राहिले आहेत. कारण त्याने कन्नड लोकांच्या त्यांच्या भाषेवरील प्रेमाची तुलना पहलगाम हल्ल्याशी केली. यानंतर, गायकाविरुद्ध पोलिस गुन्हाही दाखल करण्यात आला आणि आता राज्यातील जनता त्याच्याविरुद्ध एक झाली आहे.
25 एप्रिल 2025 रोजी बेंगळुरूतील विर्गोनगर येथील ईस्ट पॉइंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीमध्ये घडली, सोनू निगमचा कॉसर्ट आयोजित करण्यात आला होता. त्याच वेळी, एका चाहत्याने गायकाला कन्नड गाण्यांच्या चार्टबस्टर यादीतील एक कन्नड गाणं गाण्याची विनंती केली. यावर सोनू निगमने दिलेले प्रतिक्रिया तेथील लोकांनी अजिबात आवडलेली नाही. त्यामुळे गायकाविरोधात नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटक फिल्म चेंबर ऑफ कॉमर्स या विषयावर चर्चा करण्यासाठी आणि भविष्यातील कृती योजना आखण्यासाठी 5 मे रोजी तातडीची बैठक बोलावली आहे. सोनू निगम प्रकरणावर बैठक बोलण्यात आली आहे. या बैठकीसाठी इंडस्ट्रीतील दिग्गज व्यक्ती हजेरी लावणार आहेत.
सोनू निगमची बॉलिवूडमध्ये मागणी कमी झाली आहे आणि कन्नड सिनेमाने त्याला जीवनदान दिलं आहं’ असे इंडस्ट्रीतील सूत्रांचे म्हणणं आहे. कन्नड कार्यकर्त्यांच्या तक्रारीनंतर बेंगळुरू ग्रामीण पोलिसांनी गेल्या आठवड्यात अभिनेत्याविरुद्ध एफआयआर दाखल केला.
या गाण्यांमुळे सोनू निगम कर्नाटकात लोकप्रिय
मुंगारू माले (2006), मिलाना (2007) आणि गालीपाटा (2008) या सिनेमांसाठी सोनू निगम याने गाणी गायली आहेत. कन्नड इंडस्ट्रीतील रोमँटिक गाण्यांच्या बाबतीत तो सर्वात आवडत्या गायकांपैकी एक आहे. पण वादामुळे लोकांमध्ये त्याच्याबद्दल द्वेषाची बीजे पेरली गेली आहेत आणि आता भविष्यात तो तिथे त्याचा संगीत कार्यक्रम करू शकणार नाही… अशी देखील चर्चा रंगली आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
सांगायचं झालं तर, बेंगळुरू येथे झालेल्या एका कॉन्सर्टमध्ये सोनू निगम गाणी गात होता. तेव्हा एक चाहत सतत गायकावर कन्नडमध्ये गाणं गाण्यासाठी दबाव टाकत होता. अशात सोनूने चाहत्यांची इच्छा पूर्ण केली नाही कारण चाहते त्याला धमकी देत होता. यानंतर सोनू निगम याने जे वक्तव्य केलं. ज्यामुळे आता वादग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. ‘हेच कारण आहे, ज्यामुळे पहलगाम याठिकाणी युद्ध झालं आहे..’ गायकाच्या अशा वक्तव्यानंतर वादग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे..
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List