लग्नाच्या 5 महिन्यांत सोभिताने दिली गुड न्यूज? प्रेग्नंसीच्या चर्चांमागील सत्य काय?
दाक्षिणात्य अभिनेता नाग चैतन्यची पत्नी सोभिता धुलिपाला नुकतीच मुंबईत एका कार्यक्रमात सहभागी झाली होती. मुंबईतील बीकेसी याठिकाणी ‘वेव्हज 2025’ या परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. या परिषेदला नाग चैतन्य, सोभिता आणि नागार्जुन उपस्थित होते. या कार्यक्रमात सोभिताने अत्यंत सुंदर साडी नेसली होती. परंतु कार्यक्रमातील सोभिताच्या सजग वावरामुळे नेटकऱ्यांमध्ये प्रश्न उपस्थित झाला. कारण सोभिताने तिच्या साडीचा पदर हाताशी धरून पोट झाकण्याचा प्रयत्न केला होता. तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांमध्ये एकच चर्चा सुरू झाली, ती म्हणजे सोभिताच्या गरोदरपणाची. तिने पदराची मदत घेऊन बेबी बंप झाकण्याचा प्रयत्न केला, असा अंदाज नेटकऱ्यांनी वर्तवण्यास सुरुवात केली. यावर आता त्यांच्या एका जवळच्या व्यक्तीने मौन सोडलं आहे.
सोभिता खरंच प्रेग्नंट आहे का?
गेल्या काही दिवसांपासून सोभिताला सतत सैल कपड्यांमध्ये पाहिलं जातंय. सोशल मीडियावरही ती तसेच फोटो पोस्ट करतेय. त्यानंतर आता ‘वेव्हज समिट’मधील तिचा वावर आणखी शंकास्पद वाटू लागला. लग्नाच्या पाच महिन्यांनंतर सोभिता गरोदर असून ती बेबी बंप लपवण्याचा प्रयत्न करतेय, असे कमेंट्स नेटकऱ्यांनी दिले. या चर्चांवर त्यांच्या जवळच्या एका व्यक्तीने ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला प्रतिक्रिया दिली. त्यात त्या व्यक्तीने म्हटलंय, “सोभिताने सैल कपडे परिधान केले असले तरी ती गरोदर नाही.”
सोभिताशी दुसरं लग्न करण्यापूर्वी नाग चैतन्यने अभिनेत्री समंथा रुथ प्रभूशी पहिलं लग्न केलं होतं. मात्र लग्नाच्या चार वर्षांतच त्यांनी घटस्फोट घेतला. नाग चैतन्यने 8 ऑगस्ट 2025 रोजी गर्लफ्रेंड सोभिता धुलिपालाशी साखरपुडा केला होता. गेल्या काही वर्षांपासून हे दोघं एकमेकांना डेट करत होते. नाग चैतन्यचे वडील आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते नागार्जुन यांनीच या साखरपुड्याचे फोटो सर्वांत आधी सोशल मीडियावर पोस्ट केले होते. एका मुलाखतीत नाग चैतन्य तिच्याविषयी म्हणाला होता, “माझं तिच्याशी कनेक्शन खूप घट्ट आहे. ती मला खूप चांगल्याप्रकारे समजून घेते आणि ती माझ्या मनातील पोकळी भरून काढते. आमचा हा पुढचा प्रवास खूपच अप्रतिम असेल.” नाग चैतन्यशी लग्न केल्यानंतर सोभिताला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागला, किंबहुना अजूनही करावा लागतोय.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List