Chandrapur News – अल्पवयीन मुलाला शिवीगाळ आणि मारहाण प्रकरण, कावेरी कंपनीच्या व्यवस्थापकावर गुन्हे दाखल

Chandrapur News – अल्पवयीन मुलाला शिवीगाळ आणि मारहाण प्रकरण, कावेरी कंपनीच्या व्यवस्थापकावर गुन्हे दाखल

अल्पवयीन मुलाला कामावर ठेवत त्याला मारहाण केल्याप्रकरणात कावेरी C5JV या कंपनीच्या प्रकल्प व्यवस्थापकावर दुर्गापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे सदर अल्पवयीन मुलाचे प्रकरण उचलल्याने कंपनीने युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केला होता. मात्र जिल्हा बाल संरक्षण समितीच्या आदेशानंतर प्रकल्प व्यवस्थापकावर गुन्हे दाखल झाले. यानंतर सहारे यांच्यावर खंडणीचा खोटा गुन्हा दाखल केल्याचे सिद्ध झाल्याने कंपनीचे पितळ उघडे पडले. याबाबत आता न्यायालयीन लढाई आम्ही लढणार असून अल्पवयीन मुलाला न्याय दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असे विक्रांत सहारे यांनी सांगितले.

डिसेंबर 2024 मध्ये अल्पवयीन मुलाला रोजगार देतो म्हणून तत्कालीन एचआर गिरी सिद्धापल्ली याने 20 हजार रुपये घेत अल्पवयीन मुलाला कावेरी कंपनीत कामावर ठेवले. कावेरी कंपनी वेकोलीमध्ये माती उत्खनन करण्याचे काम करते. काही दिवसांनी प्रकल्प व्यवस्थापक व्यंकटेश रेड्डी, रामण्णा रेड्डी यांनी अल्पवयीन मुलाला कार्यालयात बोलावून घेत त्याला शिवीगाळ आणि मारहाण केली. तसेच ही बाब कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी मुलाला दिली.

सदर अल्पवयीन मुलाला रेड्डी यांनी कामावरून काढून टाकले. मात्र त्याला कामाचा मोबदला दिला नाही. याबाबत अल्पवयीन मुलाने जिल्हा बाल संरक्षण समितीकडे दाद मागितली होती. याबाबत मुलगा व त्याच्या आईचे जबाब नोंदविण्यात आले. संपूर्ण प्रकरणाची शहानिशा केल्यावर जिल्हा बाल संरक्षण समितीने कावेरी कंपनीवर कायदेशीर कारवाई करण्यासंदर्भात आदेश दिला.

३ मे ला जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर आणि हृदय संस्थेचे क्षेत्रीय अधिकारी शशिकांत मोकासे यांनी दुर्गापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. दुर्गापूर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम 125, 351 (2), 3 (5), अल्पवयीन न्याय मुलांची काळजी व संरक्षण कायदा 2015 कलम 75, 79, बालकामगार प्रतिबंध आणि विनियमन कायदा 1986 कलम 3 (A), 14 अंतर्गत एचआर हेड गिरी सिद्धापल्ली आणि कावेरी कंपनीचे प्रकल्प व्यवस्थापक व्यंकटेश रेड्डी रामण्णा रेड्डी यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले.

पीडित मुलाच्या आईने न्यायासाठी शिवसेना युवासेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांच्याकडेही मदत मागितली होती. सहारे यांनी आई आणि मुलाला सोबत घेत कंपनी व्यवस्थापक रेड्डी यांना जाब विचारला असता त्यांनी तुम्हाला जे करायचं आहे ते करा असे सहारे यांना सांगितले. यानंतर सहारे यांनी कामगार आयुक्त व बाल संरक्षण समितीकडे याबाबत तक्रार दाखल केली.

तक्रार केली म्हणून रेड्डी यांनी सहारे यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केला. मात्र कंपनीच्या कर्मचाऱ्याने खंडणीचा कसलाही प्रकार घडला नसल्याचे हमीपत्र न्यायालयात सादर केल्याने रेड्डी यांचे पितळ उघडे पडले. यानंतर सहारे यांनी संबंधित विभागाकडे पाठपुरावा करीत अल्पवयीन मुलाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. अखेर 3 मे रोजी दुर्गापूर पोलीस स्टेशनमध्ये विविध कलमांव्ये रेड्डी आणि सिद्धापल्ली यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले.

अल्पवयीन मुलाला मारहाण प्रकरणात रेड्डी आणि सिद्धापल्ली यांच्यावर दाखल झालेले गुन्हे हा सत्याचा विजय आहे. आम्ही प्रकरण उचलून धरले म्हणून माझ्यावर खंडणीचा खोटा गुन्हा दाखल केला, मात्र आम्ही मागे हटलो नाही. सतत पाठपुराव्याचे फलित उशिरा का होईना अखेर मिळाले, माझं राजकीय आयुष्य उध्वस्त करण्याचा हा एक प्रयत्न होता, पण प्रयत्न फसला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

जेव्हा शाहरुख आणि फराह खान यांनी मिळून काजोलची मस्करी केली, लपून छपून केले असे काम जेव्हा शाहरुख आणि फराह खान यांनी मिळून काजोलची मस्करी केली, लपून छपून केले असे काम
हिंदी सिनेमात काही जोड्या प्रेक्षकांना खूपच आवडतात. कलाकारांची ही केमिस्ट्री अशी जुळून आलेली असते की अशा जोड्यांचे चित्रपट खूपच प्रसिद्ध...
काही लोक भीती निर्माण करतात; पाकिस्तानी अभिनेता फवाद खानला प्रकाश राज यांचा पाठिंबा
बेडरुममध्ये प्रायव्हसी, मोठी बाग अन् आलिशान बंगला, रिंकू राजगुरूचं घर कसंय माहितीय का?
मंत्रालयातील दलालांनी गद्दारांना हाताशी धरून शेतकऱ्यांच्या जमिनी चढ्या दराने विकण्याचा डाव आखलाय – अंबादास दानवे
चंद्रपूरमध्ये वादळीवाऱ्यासह गारपीट, दुबार पिकांना फटका
Ratnagiri News – रत्नागिरीत बाल अंतराळवीरांची सायकल सैर, किड्स सायक्लोथॉनचे यशस्वी आयोजन
विमानतळावर लँडिंग करताना तांत्रिक बिघाड, सुरक्षा भिंतीवर आदळल्याने विमानाला अपघात