शाळेच्या आवारातच मुख्याध्यापिका आणि ग्रंथपाल यांच्यात तुंबळ हाणामारी, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी एक घटना उघडकीस आली आहे. एका शाळेत मुख्याध्यापिका आणि ग्रंथपाल यांच्यात वाद झाला आणि या वादाचं रुपांतर हाणामारीत झालं. शाळेच्या आवारातच दोघींमध्ये तुंबळ हाणामारी झाली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मध्य प्रदेशात खरगोनमधील एकलव्य आदर्श निवासी शाळेत ही घटना घडली.
शाळेच्या मुख्याध्यापिका प्रवीण दहिया आणि ग्रंथपाल मधुराणी यांच्या जोरदार भांडण झाले. या भांडणाचे हाणामारीत रुपांतर झाले. दोघींनी एकमेकांना मारहाण करत केस ओढले. तसेच एकमेकींना शिवीगाळही केली. यावेळी आसपास शाळेतील इतर शिक्षक आणि कर्मचारीही उपस्थित होते. मात्र कुणीही पुढे आले नाही. अखेर एका शिक्षिकेने मध्यस्थी करत दोघींचे भांडण सोडवले.
मुख्याध्यापिका दहिया या माझ्यावर खोट्या सह्या करण्यासाठी दबाव टाकत होत्या. मात्र आपण नकार दिला. तसेच दहिया यांचा मुलगा विनाकारण शाळेच्या आवारात फिरतो आणि आपल्याकडे बघून अश्लील हावभाव करतो. यासंदर्भात आपण तक्रारी दाखल केली होती, असा आरोप ग्रंथपाल मधुराणी यांनी केला. दरम्यान या घटनेनंतर मुख्याध्यापिका आणि ग्रंथपाल दोघींनाही निलंबित करण्यात आले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List