Haemoglobin: आता अनिमियाच्या समस्या होतील दूर, आहारात ‘या’ गोष्टींचा समावेश करा….
आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे आणि खाण्या पिण्याच्या सवयींमुळे तुमच्या शरीराला योग्य पोषण मिळत नाही. बदलत्या ऋतूमध्ये तुमच्या आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे असते. शरीराला निरोगी ठेवण्यासाठी रोगप्रतिकारकशक्ती वाढवणे गरजेचे असते. रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यास तुमच्या आहारात पोषक तत्वांचा समावेश करणे गरजेचे असते. आहारात पोषक तत्वांचा समावेश केल्यामुळे तुम्ही कमी आजारी पडता. योग्य प्रमाणात आहार खाल्ल्यामुळे तुमच्या शरीरातील रक्तामध्ये वाढ होते. उन्हाळ्यात अनेकांना सूर्यप्रकाशामुळे उष्मघाताच्या समस्या होऊ शकतात. उन्हाळ्यामध्ये वातावरणातील सूर्यप्रकाशामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होतात.
उन्हाळ्यात अशक्तपणाच्या समस्या उद्भवतात. अशक्तपणा शरीरात लाल रक्तपेशी किंवा हिमोग्लोबिनची कमतरता निर्माण होते. हिमोग्लोबिन हे एक प्रथिन आहे जे रक्ताद्वारे शरीराच्या इतर भागात ऑक्सिजन पोहोचवते. जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या शरीरातील लाल रक्तपेशी कमी होऊ लागतात तेव्हा त्या स्थितीला अशक्तपणा म्हणतात. शरीरात रक्ताची कमतरता असल्याने थकवा जाणवतो. अनेकदा तुमच्या शरीराला योग्य प्रमाणात पोषण नाही मिळाल्यामुळे अशक्तपणा होऊ शकतो.
महिलांच्या शरीरात प्रत्येक टप्प्यावर अनेक बदल होत असल्याने महिलांना अनेकदा रक्ताची कमतरता किंवा अशक्तपणाचा त्रास होतो. मासिक पाळी दरम्यान जास्त रक्तस्त्राव झाल्यामुळे किंवा पेटके आल्याने रक्त कमी झाल्यामुळे महिलांच्या शरीरात रक्ताची कमतरता निर्माण होते. जेव्हा असे होते तेव्हा त्यांना थकवा जाणवणे, काम करण्याची इच्छा नसणे किंवा पाठदुखी यासारख्या समस्यांचा त्रास होतो. म्हणून, महिलांनी त्यांच्या आहारात काही लोहयुक्त पदार्थांचा समावेश करावा जे अशक्तपणावर मात करण्यास मदत करू शकतात.
रक्त वाढवण्यासाठी महिलांनी आहारात ‘या’ 5 गोष्टींचा समावेश करा….
हिरव्या पालेभाज्या रक्त – अशक्तपणा असल्यास, महिलांनी त्यांच्या आहारात मेथी, पालक यासारख्या हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करावा. त्यामध्ये लोह, पोटॅशियम, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन सी सारखे अनेक पोषक घटक आढळतात जे हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत करतात.
सुकामेवा आणि काजू – अशक्तपणा असल्यास, तुमच्या आहारात बदाम, अक्रोड, पिस्ता, अंजीर यांसारखे सुके फळे समाविष्ट करा. त्यामध्ये लोह आणि मॅग्नेशियम सारखे पोषक घटक आढळतात, जे अशक्तपणावर मात करण्यास मदत करतात.
दुग्धजन्य पदार्थ – तुमच्या आहारात दूध आणि दुग्धजन्य पदार्थ जसे की पनीर, दही, ताक आणि लोणी यांचा समावेश करा कारण त्यामध्ये असलेले व्हिटॅमिन बी-१२ आणि लोह अशक्तपणा दूर करण्यास मदत करते.
लिंबूवर्गीय फळे – महिलांनी त्यांच्या आहारात संत्री, गोड लिंबू, लिंबू, किवी, स्ट्रॉबेरी आणि पपई यांसारखी व्हिटॅमिन सी समृद्ध लिंबूवर्गीय फळे समाविष्ट करावीत.
बीटरूट आणि गाजर – ज्या महिलांमध्ये हिमोग्लोबिन कमी आहे त्यांनी त्यांच्या आहारात बीट आणि गाजर यांचा समावेश करावा. कारण बीट हे लोहाचा चांगला स्रोत आहे जे रक्त वाढवण्यास मदत करते, तर गाजर हे व्हिटॅमिन ए आणि फायबरचा चांगला स्रोत आहे जे रक्त स्वच्छ करते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List