WAVES फक्त समिट नाही, तर ती एक लाट आहे; पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून गौरवोद्गार
न्यूज 9 ने WAVES Edition ग्लोबल समिटचं आयोजन केलं आहे. या ग्लोबल समिटवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले. यावेळी नरेंद्र मोदी यांनी WAVES फक्त समिट नाही, तर ती एक लाट आहे, असे गौरवोद्गार काढले. ते मुंबईतील जिओ कनव्हेन्शन सेंटरमध्ये आयोजित शिखर परिषदेत बोलत होते. मी सर्व ग्लोबल इन्व्हेस्टर, ग्लोबल क्रिएटर्सला आमंत्रित करतो. तुम्ही भारताला तुमचं कंटेंट प्लेग्राआऊंड बनवा. तुम्हा सर्वांना पहिल्या वेव्हज समिटसाठी शुभेच्छा देतो, असेही मोदी म्हणाले.
चारही दिशांनी आपल्याकडे शुभ विचार
“आपल्याकडे हजारो कथा आहे. आपल्या कथांमध्ये सायन्स आहे, फिक्शन आहे. आपल्या कथांची बास्केट खूप मोठी आहे. या कथा लोकांसमोर मांडणं ही व्हेवजची मोठी जबाबदारी आहे. आपल्याकडे पद्म पुरस्कार स्वातंत्र्यानंतर काही दिवसानंतर सुरू झाले. इतक्या वर्षापासून हे पुरस्कार दिले जात आहे. आम्ही या पुरस्कारांना पिपल्स पद्म केलं आहे. देशभरात समाजाची सेवा करणाऱ्या लोकांपर्यंत आम्ही गेलो. त्यांना प्रतिष्ठा दिली आहे. आम्ही पद्म पुरस्कारांचं स्वरुप बदललं. देशानेही ते मान्य केलं आहे. आता तो कार्यक्रम आयोजन झाला नाही. तर तो देशाचा उत्सव झाला आहे. तसंच वेव्ह आहे. भारताच्या कानाकोपऱ्यात जे टॅलेंट आहे, त्याला प्लॅटफॉर्म दिलं तर जगही त्याचं कौतुक केल. कंटेट क्रिएटरमध्ये भारताची एक विशेषता मदत करणारी आहे. चारही दिशांनी आपल्याकडे शुभ विचार आलं आहे. हे आपल्या सिव्हिलायझेशन ओपननेसचं प्रमाण आहे. याच अर्थाने पारशी इथे आले. ते अभिमानाने राहत आहेत. या ठिकाणी ज्यू आले. ते भारताचे झाले. या आयोजनात इतक्या देशाचे प्रतिनिधी आहेत. त्यांची स्वतची सभ्यता आहे. आर्टला वेलकम करणं, त्यांचा सन्मान करणं ही आपल्या कल्चरची ताकद आहे”, असे नरेंद्र मोदींनी म्हटले.
भारतीय खाद्यपदार्थ जगाची पसंत
“या ग्लोबल कनेक्टने आपल्या व्हिजनला अर्थ प्राप्त होईल. जगाच्या बाहेरच्या क्रिएटिव्ह लोकांना सांगतो, तुम्ही जेव्हा भारताशी जोडले जाल, भारताच्या कहाण्या ऐकाल तर तुम्हाला असंख्य गोष्टी मिळतील. तुमच्या देशातही अशाच गोष्टी आहेत हे दिसेल. तुम्ही भारताशी त्यामुळे जोडले जाल. त्यामुळे तुम्हाला क्रिएट इन इंडियाचा मंत्र सोपा वाटेल. भारतात ऑरेंज इकोनॉमीचा उदय काल आहे. कंटेट, क्रिएटिव्हीटी आणि कल्चर हे ऑरेंज इकोनॉमीचे तीन स्तंभ आहेत. इंडियन फिल्मची रिच जगात जात आहे. आज १००हून अधिक देशात भारतीय सिनेमा रिलीज होतात. फॉरेन ऑडियन्स केवळ भारतीय सिनेमा पाहत नाही तर तो समजून घेत आहे. इंडियन कंटेट सबटायटलने पाहत आहेत. स्क्रिन साईज छोटा होत असला तरी स्कोप इनफिनिट आहे. स्क्रिन मायक्रो होत आहे, पण मेसेज मेगा होत आहे. भारतीय खाद्यपदार्थ जगाची पसंत होत आहे. मला विश्वास आहे की, भारताचे गाणेही जगाची ओळख बनेल. भारताची क्रिएटीव्ह इकोनॉमी जीडीपीत योगदान वाढवू शकते. भारत फिल्म प्रोडक्शन, संगीत, फॅशनचा ग्लोबल हब होत आहे”, असेही त्यांनी सांगितले.
भारताकडे जगातील सर्वात मोठी यंग पॉप्युलेशन
“आज ग्लोबल एनिमेशन मार्केटचा साईज ४३० मिलियन डॉलर आहे. येणाऱ्या काळात हे वाढणार आहे. भारताच्या एनिमेशन आणि ग्राफिक्ससाठी ही खूप मोठी संधी आहे. देशातील सर्व क्रिएटरला सांगतो, तुम्ही गुवाहाटीचे संगीतकार असो की पंजाबच सिनेनिर्माते असो तुम्ही भारताच्या इकोनॉमित नवीन व्हेव आणत आहात. क्रिएटिव्हिटीची व्हेव आणत आहात. तुम्ही मेहनत घेत आहात. केंद्र सरकार तुमच्या सोबत आहे. तुमच्या संकल्पना, आणि विचाराची व्हॅल्यू असेल असं आम्ही करत आहोत. तुमच्या स्वप्नांना सामर्थ्य देण्याचा आमचा प्रयत्न आहे. तुम्हाला एक असं प्लॅटफॉर्म देऊ. जिथे क्रिएटिव्ह आणि कोडिंग एकसाथ होईल, सॉफ्टवेअर आणि स्टोरी टेलिंग जिथे एकत्र असेल. तुम्ही या प्लॅटफॉर्मचा वापर करा. मोठी स्वप्न पाहा. ते पूर्ण करण्यासाठी संपूर्ण ताकद लावा. माझा तुमच्यावर विश्वास आहे. कंटेट क्रिएटरवर विश्वास आहे. युथच्या वर्किंग स्टाईलमध्ये बॅरिअर किंवा बॉन्ड्री नसते. तुमची क्रिएटिव्हीटी फ्रि असते. हा संयोग नाही. भारताकडे जगातील सर्वात मोठी यंग पॉप्युलेशन आहे. अशाकाळात आपली क्रिएटिव्हीटीही बहारत आहे. आपले यंग माइंड्स या प्रत्येक फॉरमॅटममध्ये काम करत आहे. व्हेव्स आपल्या जनरेशनसाठी आहे”, असा सल्ला मोदींनी तरुणांना दिला.
माणसाला अधिकाधिक संवेदनशील आणि समृद्ध करायचं
“क्रिएटिव्हिटीच्या जगातील दिग्गजांसमोर मी आणखी एक विषय मांडतो. तो विषय आहे, क्रिएटिव्ह रिस्पॉन्सिबिलीटी. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात टेक्नॉलॉजीची भूमिका वाढत आहे. अशावेळी मानवीय संवेदना कायम ठेवण्यासाठी एक्स्ट्रा एफर्टची गरज आहे. ते क्रिएटिव्ह वर्ल्डच करेल. आपल्याला मनुष्याला रोबर्ट नाही बनवायचं. आपल्याला माणसाला अधिकाधिक संवेदनशील आणि समृद्ध करायचं आहे. व्यक्तीची समृद्धी ही माहिती जगताच्या पर्वतातून येणार नाही, टेक्नॉलॉजीतून येणार नाही त्यासाठी आपल्याला गीत, संगीत, कला, नृत्याला महत्त्व द्यावे लागेल. हजारो वर्षापासून मानवीय संवेदनाला जागृत ठेवलं आहे. आपल्याला ते अजून मजबूत करायचं आहे. आज आपल्या यंग विचाराला मानवताविरोधी विचारापासून वाचवलं पाहिजे. व्हेव्स हे काम करू शकतं. या जिम्मेदारीपासून मागे हटलो तर युवा पिढीसाठी ते घातक ठरेल. ग्लोबल कोऑर्डिनेशन आता तेवढंच महत्त्वाचं आहे. हा मंच आपल्या क्रिएटर्सला ग्लोबल स्टोरी टेलर्सशी कनेक्ट करेल. आपल्या एनिमेटर्सला ग्लोबल व्हिजनरीशी जोडेल. ग्लोबल चॅम्पियन बनवेल. मी सर्व ग्लोबल इन्व्हेस्टर, ग्लोबल क्रिएटर्सला आमंत्रित करतो. तुम्ही भारताला तुमचं कंटेंट प्लेग्राआऊंड बनवा. तुम्हा सर्वांना पहिल्या वेव्हज समिटसाठी शुभेच्छा देतो”, असेही ते म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List