डाळिंब खाण्यासोबतच तुम्ही अशाप्रकारे केसांना लावल्यास मिळतील आश्चर्यकारक फायदे, जाणून घ्या
प्रत्येक महिलेला तिचे केस लांब आणि रेशमी व्हावे असे वाटत असते. त्यातच आताच्या या काळात केस गळणे ही एक सामान्या समस्या झालेली आहे. त्यामुळे या समस्येने प्रत्येक दुसरा तिसरा व्यक्ती त्रस्त आहेत. यासाठी अनेकजण केसगळतीच्या समस्येवर मात करण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेले केसांचे महागडे प्रॉडक्ट वापरतात. पण त्यांचा फारसा फरक पडत नाही. सुंदर केस कोणाला आवडत नाहीत? बऱ्याचदा असे घडते की आपण स्वतःचे केस पाहतो आणि पातळ आणि गळून कमी झालेले केस पाहून केसांची चिंता वाटू लागते. पण यावर मात करण्यासाठी आम्ही आज या लेखाद्वारे केसांना मजबूत आणि सुंदर बनवण्यासाठी अशा टिप्स घेऊन आलो आहोत, जी तुमच्यासाठी व केसांसाठी गेम चेंजर ठरणार आहे. डाळिंब खाण्याचे फायदे आपल्या सर्वांना माहित आहेत पण आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की ते खाण्याव्यतिरिक्त तुम्ही तुमच्या केसांना देखील लावू शकता. डाळिंब हे तुमचे केस सुंदर, रेशमी, मजबूत आणि लांब बनवण्याचा एक नैसर्गिक मार्ग आहे.
आज आपण तुमच्या केसांवर डाळिंब कसे वापरू शकता याबद्दल सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. जर तुम्हाला तुमचे केस सुंदर बनवायचे असतील तर ते खाण्याव्यतिरिक्त तुम्ही डाळिंबाचे तेल किंवा मास्कद्वारे तुमच्या केसांना देखील लावू शकता. डाळिंब हे एक सुपरफूड आहे जे जीवनसत्त्वे, अँटिऑक्सिडंट्स आणि फॅटी अॅसिडने समृद्ध आहे. केसांची काळजी घेण्यापासून ते एकूण आरोग्यापर्यंत, खूप फायदेशीर आहेत.
डाळिंबाचा रस तेलात मिक्स करून केसांना लावा
डाळिंबाचा रस तेलात मिक्स आणि केसांना लावा. तसेच डाळिंबाच्या बियांचे तेल बाजारात देखील उपलब्ध आहे ज्यामध्ये प्युनिकिक अॅसिड आणि ओमेगा-5 फॅटी अॅसिडसारखे पोषक घटक असतात. ते तुमच्या टाळूमध्ये खोलवर मॉइश्चरायझेशन करते. हे तेल दररोज केसांना लावा आणि मसाज करा. यामुळे तुमचे रक्ताभिसरण सुधारेल आणि तुमचे केसही मजबूत होतील. तसेच ज्यांचे केस खुप पातळ आहेत ते केसांना निरोगी देखील बनवते. डाळिंबाच्या बियांचे तेल लावण्यापूर्वी ते थोडेसे गरम करा. जर तुमच्याकडे डाळिंबाचे तेल नसेल तर तुम्ही डाळिंबाचा रस तेलात मिक्स करून देखील ते लावू शकता. तासभर ठेवल्यानंतर केस शॅम्पूने धुवा.
डाळिंबाचा हेअर मास्क
खोल कंडिशनिंगसाठी तसेच तुमचे केस कोरडे आणि खराब झाले असतील तर तुम्ही घरी डाळिंबाचा हेअर मास्क बनवू केसांना लावू शकता. यासाठी तुम्हाला जास्त काही करण्याची गरज नाही, तर ताजे डाळिंबाचा रस घ्या आणि त्यात दही, मध योग्य प्रमाणात मिक्स करून त्यांची पेस्ट बनवा. ही पेस्ट तुम्हाला तुमच्या केसांना व्यवस्थित लावावी लागेल. 30 मिनिटे ठेवल्यानंतर कोमट पाण्याने धुवा. हा डाळिंबाचा हेअर मास्क तुमच्या केसांना हायड्रेट ठेवतो, तसेच केसांना चमक देतो आणि कुरळे केस मऊ आणि रेशमी बनवण्यास मदत करतो.
शाम्पू केल्यानंतर डाळिंबाचा रस अशा प्रकारे वापरा
डाळिंबाचा रस केवळ तुमच्या त्वचेसाठीच नाही तर केसांसाठीही खूप फायदेशीर आहे. व्हिटॅमिन सी आणि ई ने समृद्ध असलेले डाळिंबाचा रस केसांवर नैसर्गिक कंडिशनर म्हणून काम करतो. हे लावल्याने निर्जीव केसांमध्ये चमक येते. शॅम्पू केल्यानंतर, पाण्यात डाळिंबाचा रस मिसळा आणि त्या पाण्याने केस धुवा.
डाळिंबाच्या सप्लिमेंट्स घेतल्याने केस गळती रोखता येते
जर तुम्हाला केस गळणे थांबवायचे असेल तर तुम्ही डाळिंबाच्या सप्लिमेंट्सचा वापर करावा. त्यात मुबलक प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात. ज्यामुळे तुमचा ताण कमी होतो आणि केस गळतीही थांबते. जर तुम्ही डाळिंबाचे सप्लिमेंट घेण्याचा विचार करत असाल तर एकदा तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्या.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List