राजधानी दिल्लीला मुसळधार पावसाने झोडपले; 40 विमान फेऱ्यांना फटका, रेड अलर्ट जारी

राजधानी दिल्लीला मुसळधार पावसाने झोडपले; 40 विमान फेऱ्यांना फटका, रेड अलर्ट जारी

राजधानी दिल्ली आणि एनसीआरमध्ये शुक्रवारी सकाळी जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस पडला. काही भागात गारपीटही झाली, त्यामुळे तापमानात घट झाली आणि हवामान आल्हाददायक झाले. मात्र, पावसामुळे सकाळी कार्यालयात जाणाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागला. तसेच अनेक भागात पाणी साचले आणि या हवामानाचा फटका विमान सेवांनाही बसला. त्यामुळे राजधानीतील जनजीवन विस्कळीत झाले होते.

खराब हवामानामुळे 40 पेक्षा जास्त उड्डाणे वळवण्यात आली, तर सुमारे 100 उड्डाणे विलंबाने होत आहेत. भारतीय हवामान खात्याने राजधानी दिल्लीसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. पुढील काही तासांत दिल्ली आणि आसपासच्या भागात 70-80 किमी प्रतितास वेगाने जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. या अवकाळी पावसाने काही दिवस वाढत्या उष्णतेपासून दिलासा मिळेल आणि कमाल तापमान 40 अंशांपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे.

हवामान खात्याने दिल्लीत वादळी वारे आणि पावसासाठी जारी केलेला रेड अलर्ट सकाळी 8.30 वाजेपर्यंत वाढवला आहे. तसेच लोकांना घरातच राहण्याचा आणि आवश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन केले आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये जोरदार वादळ आणि मुसळधार पावसामुळे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील अनेक विमान उड्डाणांवर परिणाम झाला आहे. याबाबत विमानतळ प्रशासनाने प्रवाशांसाठी एक विशेष सूचना जारी केली आहे. खराब हवामानामुळे दिल्ली विमानतळावरील काही उड्डाणांवर परिणाम झाला आहे, असे या सूचनेत म्हटले आहे. प्रवाशांना त्यांच्या विमान उड्डाणाच्या अपडेट्ससाठी त्यांच्या संबंधित विमान कंपन्यांशी संपर्क साधण्याची विनंती करण्यात येत आहे.

राजधानी दिल्लीसह उत्तर पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, नैऋत्य राजस्थान, ओडिशा, छत्तीसगड, दक्षिण गंगा किनारी पश्चिम बंगाल आणि उत्तर किनारी आंध्र प्रदेशांसाठीही हवामान खात्याने इशारा जारी केला आहे. पुढील काही तासांत ओडिशातील कंधमाल, कालाहांडी आणि रायगडा जिल्ह्यांमध्ये ताशी 60 ते 70 किमी वेगाने जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. या भागात वीज कोसळण्याची आणि मुसळधार पावसाची चेतावणी देण्यात आली आहे, ज्यामुळे सामान्य जीवन प्रभावित होऊ शकते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

अजितदादांचा शिवसेना ठाकरे गटाला मोठा दणका; बडा नेता सोडणार उद्धव ठाकरेंची साथ अजितदादांचा शिवसेना ठाकरे गटाला मोठा दणका; बडा नेता सोडणार उद्धव ठाकरेंची साथ
लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं होतं. महायुतीमधील अनेक दिग्गज उमेदवारांचा पराभव झाला. मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये...
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेच्या एप्रिलच्या हप्त्याबाबत महत्त्वाची बातमी, आदिती तटकरेंनी दिली मोठी अपडेट
‘प्रियांका चोप्राने केलं ते पण अश्लील होतं..’, एजाज खानला पाठिंबा देत अभिनेत्रीचा सवाल
अनिल कपूर यांच्या आईचे निधन, कपूर कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर
Buldhana News – कर्जमाफीसाठी भर उन्हात निघाला ट्रॅक्टर मोर्चा, हजारो शेतकरी उतरले रस्त्यावर
भाजप नेत्याची आमदारकी रद्द, अधिकाऱ्यावर पिस्तूल रोखणं पडलं महागात
Himachal Pradesh – मंडी, हमीरपूर, चंबा नंतर आता कुल्लूमध्ये बॉम्बस्फोटाची धमकी, प्रशासनाकडून अलर्ट जारी