लग्नाच्या 18 व्या वाढदिवसानिमित्त ऐश्वर्याने पोस्ट केला ‘तो’ फोटो; चाहते म्हणाले ‘डोळ्यांमध्ये वेदना..’
अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन हे गेल्या काही महिन्यांपासून सतत त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चांमुळे प्रकाशझोतात आहेत. ऐश्वर्या तिची मुलगी आराध्यासोबत वेगळी राहत असल्याचंही म्हटलं गेलंय. परंतु या कोणत्याच चर्चांवर दोघांनी अद्याप प्रतिक्रिया दिली नव्हती. या चर्चांदरम्यान दोघांना एकत्र पाहिलं गेलं की चाहते फार खुश व्हायचे. असंच काहीसं आता ऐश्वर्याच्या इन्स्टाग्रामवरील फोटोमुळे घडलंय. लग्नाच्या 18 व्या वाढदिवसानिमित्त खास फॅमिली फोटो पोस्ट करत ऐश्वर्याने चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. पती अभिषेक आणि मुलगी आराध्या यांच्यासोबतचा सेल्फी पोस्ट करत तिने घटस्फोटाच्या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. या दोघांना पुन्हा एकत्र पाहून चाहते खूप खुश झाले आहेत. ऐश्वर्याच्या या फोटोवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय.
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चनने 20 एप्रिल 2007 रोजी लग्नगाठ बांधली होती. त्यांच्या लग्नाला 18 वर्षे पूर्ण झाली आहेत. लग्नाच्या वाढदिवसानिमित्त कॅप्शनमध्ये हृदयाचा इमोजी पोस्ट करत ऐश्वर्याने हा खास फोटो शेअर केला आहे. या फोटोवर अभिनेत्री प्रियांका चोप्रासह इतरही सेलिब्रिटींनी लाइक्सचा वर्षाव केला आहे. ‘अखेर सर्वकाही ठीक झालं, कुटुंबापेक्षा अधिक काहीच महत्त्वाचं नाही’, असं एकाने लिहिलं. तर ‘या दोघांना एकत्र पाहून मी खूप आनंदी आहे’, असं दुसऱ्य़ा युजरने म्हटलंय. ‘घटस्फोटाच्या चर्चा पसरवणाऱ्यांनी एकदा हा फोटो पहा, सर्वांची बोलती बंद झाली पाहिजे’, असंही नेटकऱ्यांनी लिहिलं आहे. मुलगी आराध्यासाठी ऐश्वर्या आणि अभिषेक एकत्र आले आहेत, असाही अंदाज काहींनी वर्तवला आहे. ‘ऐश्वर्याच्या डोळ्यांमध्ये वेदना दिसून येत आहेत, ही तडजोड फक्त मुलीसाठी आहे’, असं म्हटलंय.
2024 पासूनच अभिषेक आणि ऐश्वर्याच्या नात्यात सर्वकाही आलबेल नसल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. विविध कार्यक्रमांमध्ये ऐश्वर्या तिच्या मुलीसोबत यायची आणि अभिषेक त्याच्या कुटुंबीयांसोबत वेगळा यायचा. तेव्हापासूनच या दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चांना सुरुवात झाली. इतकंच नव्हे तर ‘दसवी’ फेम अभिनेत्री निम्रत कौरसोबत अभिषेकच्या अफेअरच्याही चर्चा होत्या.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List