शरद पवारांचे विलीनीकरणाचे संकेत;खरंच हे पक्ष बांधतील काँग्रेससोबत मोट?

शरद पवारांचे विलीनीकरणाचे संकेत;खरंच हे पक्ष बांधतील काँग्रेससोबत मोट?

महाराष्ट्रातीलच नाही तर देशातील राजकारणात शरद पवार यांची पॉवर अनेकांना माहिती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर असताना त्यांच्या हिटलिस्टवर पवारचं होते. पक्ष फुटीनंतर पवार डगमगले नसले तरी राजकीयदृष्ट्या पक्षाची मोठी हानी झाली हे नाकारुन चालत नाही. शिवसेनेतील उभ्या फुटीनंतर उद्धव ठाकरे हे पण एकहाती लढाई लढत आहेत. त्यातच शरद पवार यांनी अनेक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होण्याचे काल संकेत दिले. या राजकीय बॉम्बने सर्वांनाचा आश्चर्याचा धक्का दिला. आता राहुल गांधींच्या नेतृत्वात कोण कोण राजकीय लढाई लढणार हा खरा प्रश्न आहे.

आताच ही चर्चा का?

सोनिया गांधी या परदेशी नागरीक असल्याच्या मुद्यावरुन शरद पवार यांनी त्यांच्या काँग्रेसमधील साथीदारांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काढला. त्यावेळी त्यांनी पक्ष नेतृत्वावर प्रखर टीका केली. विरोधात निवडणूक लढली. नंतर आघाडी केली. आता काँग्रेसमध्ये थेट विलीन होण्याचा दावा त्यांनी केला नाही. तर संकेत दिले आहे. व्यवहारिकदृष्ट्या त्यात चूक काही वाटत नाही. सध्याची परिस्थिती पाहता आणि मोदीविरोधातील खेम्यात एकजुटीसाठी हा प्रयोग अव्यवहारीक तर वाटत नाही.

काँग्रेसमध्ये होतील विलीन

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पवारांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. शरद पवार यांना अस्तित्व टिकविण्यासाठी काँग्रेसमध्ये सहभागी व्हावे लागेल. पराभव त्यांना टप्यात दिसत आहे. त्यामुळे 4 जूनपूर्वी शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गट काँग्रेसमध्ये विलीन होईल असे ते म्हणाले.

अजित पवारांचे सडेतोड उत्तर

तर अजित पवार यांनी काकांचे विधान फारसे काही मनावर घेतले नाही. शरद पवार यांच्यासोबत दीर्घ राजकीय प्रवास त्यांनी केला आहे. शरद पवार अथवा उद्धव ठाकरे हे काही काँग्रेसमध्ये विलीन होणार नाहीत. कधी कधी संभ्रम निर्माण होण्यासाठी ते असे विधान करतात, असा टोला त्यांनी हाणला.

जनता सरकारची आठवण

काल एका वृ्त्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार यांनी जनता सरकारची आठवण काढली. सध्याची परिस्थिती अगदी तशीच असल्याचे ते म्हणाले. जनता पक्षाने 1977 साली केंद्रात सत्ता मिळवली होती. हे सरकार निवडणुकीनंतर विविध पक्षांच्या सहकार्याने स्थापित झाले होते. याकडे त्यांनी लक्ष वेधले. सध्या विरोधकांनी पंतप्रधान पदाचा चेहरा जाहीर केला नाही. जनता पक्षाच्या काळात मोररजी देसाई यांचे नाव निवडणुकीनंतर समोर आल्याचे त्यांनी सांगितले.

विरोधी गोटात UPA-3 ची चर्चा

  1. भाजपविरोधात देशातील काही राजकीय पक्षांनी मोट बांधली. गेल्यावर्षी नितीश कुमार यांनी या प्रयोगाचा श्रीगणेशा केला. पण तेच नंतर भाजपच्या खेम्यात दाखल झाले. INDIA Alliance चा प्रयोग करण्यात आला. त्यातील काही घटक पक्षांनी लोकसभेसाठी वेगळी चूल मांडली. तर काही राज्यात तडजोडी झाल्या.
  2. पण सध्याच्या राजकीय परिस्थितीत अस्तित्व टिकविण्यासाठी मोदी विरोधातील राजकीय घटक UPA-3 ची चर्चा करत आहेत. इंडिया आघाडीत स्थानिक, प्रादेशिक पक्षांना मोठा वाव आहे. त्यांना एनडीएविरोधात एक सक्षम पर्याय तयार करण्याची मोठी संधी आहे. अनेक पक्षांना खिंडार पाडण्यात भाजप यशस्वी झाली आहे. त्यामुळे गटा-गटाने लढण्यापेक्षा एका मोठ्या छताखाली एकत्र येत लढण्यात काय वाईट असा सूर उमटत आहे.
  3. सध्या शिवसेना उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, समाजवादी पार्टी, आरजेडी, जेएमएम आणि डीएमके हे काँग्रेससोबत आहेत. शक्यता आहे की निवडणुकीनंतर ते अजून जवळ येऊन मजबूत असा गट करतील. तृणमूल काँग्रसेला पश्चिम बंगालमध्ये फटका बसल्यास, ममता बॅनर्जी यांना पण अस्तित्वाची लढाई लढावी लागेल. त्या पण काँग्रेसकडे झुकू शकतात. इतर अनेक राज्यात जे काँग्रेसपासून दुरावलेले आहेत. पण त्यांना मोदी सरकार नकोय, त्यांच्यासाठी काँग्रेस हा पर्याय असू शकतो.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मतदानाच्या दिवशीच मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत, निवडणूक कर्मचाऱ्यांना फटका मतदानाच्या दिवशीच मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत, निवडणूक कर्मचाऱ्यांना फटका
देशातील ४९ जागांवर मतदान सोमवारी सुरु झाले. त्यात महाराष्ट्रातील १३ जागांवर मतदान होत आहे. मतदानाच्या या शेवटच्या टप्प्यातील मुंबईतील सहा...
अब तो अपना राज है, डरने की क्या बात…, अमिताभ बच्चन यांनी हटके स्टाईलमध्ये केलं मतदान करण्याचं आवाहन
Sambhaji Raje : जातीच्या मुद्यावरुन पाडापाडीवर काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती? Video
भारताचं नागरिकत्व मिळाल्यानंतर अक्षय कुमारने बजावला मतदानाचा हक्क, ‘उमेदवाराला मतदान करताना…’
मतदान सुरु होण्यापूर्वीच अनिल अंबानी मतदानासाठी रांगेत, व्हिडिओ आला समोर
बड्या बिल्डरच्या मुलाच्या पॉश कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणीचा जागीच मृत्यू
सांगली रेल्वेस्थानक बॉम्बने उडविण्याची धमकी देणारा ताब्यात, फलटणच्या तरुणाला मुंबईतून केली अटक