समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांना वाहन चालवण्यास बंदी, पोलिसांनी बॅरिकेडिंग करत रस्ते केले बंद

समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांना वाहन चालवण्यास बंदी, पोलिसांनी बॅरिकेडिंग करत रस्ते केले बंद

सुमद्रकिनाऱ्यावर वाहने घेऊन जाणाऱ्या पर्यटकांना शिस्त लावण्यास जिल्हा प्रशासन आणि स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन अपयशी ठरले. यामुळे आता पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहेत. आजूबाजूला मिळेल ते साहित्य वापरून समुद्रकिनाऱ्यावर जाणारे रस्ते बंद करण्याची मोहिम पोलिसांनी हाती घेतली आहे. दापोली तालुक्यातील मुरूड, कर्दे तसेच रत्नागिरी तालुक्यातील जयगड, भाट्ये, आरे-वारे, गणपतीपुळे आणि काजीरभाटी किनारे पोलिसांनी दगड, चिरे, माड, झाप आणि लाकडं गोळा करून बंद केले आहेत.

रत्नागिरी पोलिसांनी समुद्र किनाऱ्यावर वाहन चालविण्यास मनाई केली असून कुणी किनाऱ्यावर वाहन चालवताना आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. तसेच समुद्र किनाऱ्यावर कुणी वाहन चालवत असेल तर 112 ला फोन करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिक ग्रामपंचायतींना महसूल मिळतो. काही ठिकाणी पार्किंग शुल्कही आकारले जाते. मात्र वाहने समुद्र किनाऱ्यावर जाऊ नये याकरिता कोणतीही उपाययोजना योजना केली जात नाही. निधी मिळत नाही अशी उत्तरे दिली जातात. आज पोलिसांनी काही समुद्र किनाऱ्यावर आजूबाजूला पडलेले दगड, चिरे, माड, झाप आणि लाकडं गोळा करून बॅरिकेडिंग केले आहे. निधी नाही म्हणून काम न करणाऱ्या संबंधित प्रशासनाला पोलिसांनी इच्छाशक्ती असेल तर काही करू शकतो हे दाखवून दिले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;