‘माझं कुंकू, माझा देश’, पंढरपुरात हिंदुस्थान-पाक क्रिकेट सामन्या विरोधात शिवसेनेचे निषेध आंदोलन

‘माझं कुंकू, माझा देश’, पंढरपुरात हिंदुस्थान-पाक क्रिकेट सामन्या विरोधात शिवसेनेचे निषेध आंदोलन

हिंदुस्थान-पाकिस्तान क्रिकेट सामन्याच्या विरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आक्रमक झाली आहे. राज्यभरात ठिकठिकाणी शिवसेनेकडून आंदोलन केलं जातंय. शनिवारी उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत आक्रमक भूमिका मांडली होती. त्यानंतर आता ठिकठिकाणी शिवसेनेकडून आंदोलन केलं जातंय. आज पंढरपुरातही शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पदाधीकारी व शिवसैनिकांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे एकत्र येत हिंदुस्थान आणि पाकिस्तान क्रिकेट सामना होणार असताना मोदी सरकार बघ्याची भूमिका घेत असल्याने निषेधाच्या जोरदार घोषणा दिल्या. तरपहलगाम इथल्या दहशतवादी हल्ल्याच्या जखमा भरल्या नसताना आणि शहीद जवानांचे रक्त सुकलेले नसताना पाकिस्तानशी क्रिकेट सामने कसे, असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला. या सामन्याला शिवसेनेचा विरोध असून ‘माझं कुंकू, माझा देश’ हे आंदोलन आज केलं जात आहे.

यावेळी बोलताना शिवसेना पंढरपूर विभाग जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे म्हणाले, 22 एप्रिल रोजी कश्मीरच्या पहलगाम येथे अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात अनेक निष्पाप पर्यटक मारले गेले. अनेक माता भगिनींचे कुंकू पुसले गेले. ज्या कुटुंबातील बळी गेले आहेत त्यांची दुःख दुर्लक्षित करून हिंदुस्थानींच्या मनात पाकिस्तानबद्दल असलेला प्रचंड संताप याकडे केवळ हेतून दुर्लक्ष करीत आज हिंदुस्थान विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट मॅचच्या आयोजन करण्यात आले आहे. दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानचे पाणी बंद करू, अशी वल्गना करणारे पंतप्रधान मोदी हिंदुस्थान युद्ध जिंकत आलेला असताना युद्ध थांबवतात. बदला घेणे अजून बाकी असताना क्रिकेट खेळणे सुरू केले आहे. ज्या महिलांनी आपले पती गमावले त्यांचा हा मोठा अपमान आहे. लोक भावना म्हणून माझा देश माझं कुंकू या अभियानातून मोदी सरकारला कुंकू पाठवणार असल्याचे सांगण्यात आले.

यावेळी जिल्हा प्रमुख संभाजीराजे शिंदे,उपजिल्हा प्रमुख काकासो बुराडे उपजिल्हा प्रमुख जयवंत माने, पंढरपूर तालुका प्रमुख बंडू घोडके, शहर प्रमुख युवराज गोमेवाडीकर, उपतालुका प्रमुख उत्तम कराळे, संजय घोडके, नागेश रितुण्ड, शेतकरी सेनेचे शिवाजी जाधव, रणजित बागल,उपशहर प्रमुख प्रशांत पवार, नितीन थिटे, प्रशांत जाधव, सोमनाथ अनपट, दादासो मोरे, अंकुश साळूंखे, भारत पोरे, समाधान गोरे, युवा उपअधिकारी समाधान जगदाळे, जीवन चव्हाण, गौसफाक, शिव आरोग्य सेनेचे समाधान गिड्डे, अर्जुन भोसले, तालुका सम्वनयक कृष्णदीप लवटे, बंडू सुरवसे, जालिंदर शिंदे, उमेश साळूंखे,बाळासाहेब पवार, नामदेव चव्हाण, भारत कदम, विलास चव्हाण,अनिल पवार, महेश यादव, विजय जाधव, उपशहर प्रमुख अविनाश खुळपे, दत्तात्रय पाटील, अमोल पवार, अक्षय शेम्बडे, शंकर हिंगमिरे, विशाल कांबळे, अजय वाघमारे, कल्याण कदम, शिवाजी राऊत, स्वप्नील कदम, कैलास शिंदे, मनोज शिंदे, एकनाथ कोरपडे, नवनाथ सुरवसे, पिंटू घोडके, निपुण काळे, राहुल काळे, बापू कदम, नवनाथ चव्हाण, गजानन टल्लू, निखिल चव्हाण आदी उपस्थित होते.

यावेळी शिवसेना उद्धव बाळसाहेब ठाकरे सेनेच्या महिला पदाधिकारी व शिवसैनिक संगीता पवार, रुपाली पवार, मंजुळा दोडमिसे, अनिता आसबे,रेहाना आतार, विमल टिंगरे, बायडा सर्जे, अनिता जाधव, कविता पवार,ते जस्विनी नायकुडे, अविंदा कोळी, सरस्वती गोसावी, संगीता कोळी, मोनाली लोहार ,रेशमा चांदणे, भामाबाई देवकर, सना वाघमारे, ललिता सावंत यांच्यासह महिला शिवसैनिकांनी मोदी सरकारला माझा देश माझं कुंकू या अभियानातून कुंकू पाठविण्याचा निर्धार व्यक्त केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

आयुष्यातील जास्त तणाव ठरतोय केसगळतीचे मुख्य कारण, जाणून घ्या महत्वाची माहिती  आयुष्यातील जास्त तणाव ठरतोय केसगळतीचे मुख्य कारण, जाणून घ्या महत्वाची माहिती 
आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये अगदी कमी वयातील मुलांना देखील केस गळतीची आणि केस पांढरे होण्याची समस्या जाणवते. यामुळे फक्त अनुवांशिक कारण...
वेळ न सांगता येऊन बघा, खरी परिस्थिती कळेल; अजित पवारांना पुणेकर महिलेने सुनावले
Pune: खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
ईएमआय थकवला तर मोबाईल लॉक होणार, हप्त्यावर फोन घेणाऱ्यांसाठी नवा नियम
रनवेवरून धावणाऱ्या विमानाला इमर्जन्सी ब्रेक, लखनौ विमानतळावर मोठी दुर्घटना टळली
‘दशावतार’ने गारुड घातलं; प्रेक्षकांचा दमदार प्रतिसाद, दोन दिवसांत दोन कोटीची झेप
वेळेआधी आला..अन् वेळेआधी निघालासुद्धा; परतीच्या पावसाचा महाराष्ट्राला दणका