एटीएम मशिन फोडून पैसे चोरणारी आंतरराज्य टोळी पकडली; वाहन, रोख रक्कमेसह 12 लाखांचा मुद्देमाल जप्त

एटीएम मशिन फोडून पैसे चोरणारी आंतरराज्य टोळी पकडली; वाहन, रोख रक्कमेसह 12 लाखांचा मुद्देमाल जप्त

राजस्थान, हरियाणा, मध्यप्रदेशातील आंतरराज्य टोळीतील चारजणांना पोलीसांनी ताब्यात घेतले. रोख रक्कम, वाहनासह 12 लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, काही दिवसापूर्वी पोलीस ठाणे उदगीर ग्रामीण हद्दीमध्ये अज्ञात आरोपीच्या टोळीने ए.टी.एम. मशीन गॅस कटरने तोडून त्यामधील रोख रक्कम चोरल्याची घटना घडली होती. त्यावरून अज्ञात आरोपींच्या टोळी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. एटीएम मशीन कट करून त्यामधील रोख रक्कम चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीतील चारजणांना दिनांक 10 सप्टेंबर रोजी दुपारी 03 वाजण्याच्या सुमारास ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या कारची झडती घेतली असता त्यांच्याकडे गॅस टाकी, ऑक्सिजन सिलेंडर, गॅस कटर, तेलंगणा राज्याचे दोन बनावट नंबर प्लेट, तसेच एक लाकडी मूठ असलेला खंजीर व रोख 01 लाख रुपये मिळून आले. मोहम्मद फजरूद्दीन(40) (राजस्थान), मुस्तकीम आमीन(26) (हरियाणा)
हमीद हबीबखान (25) (मध्य प्रदेश). लीखीमन हूरी (गुज्जर) (27) (राजस्थान) यांना अटक करण्यात आली आहे.

उदगीर येथील ए.टी.एम. गॅस मशीनने कट करून त्यामधील रोख रक्कम एक लाख रुपये चोरी केल्याचे कबूल केले. सदरची चोरी केलेली रोख रक्कम एक लाख रुपये , गॅस सिलेंडर, ऑक्सीजन सिलेंडर गॅस, कटर, खंजीर तसेच गुन्ह्यात वापरलेली कार असा एकूण 12 लाख 24 हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पोलीस अमलदार सर्जेराव जगताप, युवराज गिरी, रियाज सौदागर, राजेश कंचे, गोविंद भोसले, जमीर शेख, मोहन सुरवसे, सिद्धेश्वर मदने, राहुल कांबळे,शैलेश सुडे, हरी पतंगे, महिला पोलिस अमलदार अंजली गायकवाड यांनी केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

काय चाललंय सरकारमध्ये? अधिकाऱ्यानेच अधिकाऱ्याकडून घेतली लाच! लाचखोर अधिकारी, कंत्राटी कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात काय चाललंय सरकारमध्ये? अधिकाऱ्यानेच अधिकाऱ्याकडून घेतली लाच! लाचखोर अधिकारी, कंत्राटी कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात
रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने स्थानिक निधी लेखा परीक्षण कार्यालयालयातील सहाय्यक संचालक, सहायक लेखाधिकारी आणि कंत्राटी शिपाई यांना लाच घेताना रंगेहाथ...
अमेरिकेत नेव्हल अकादमीत अंदाधुंद गोळीबार, अनेकजण जखमी
Skin Care – ऋतूनुसार तुमच्यासाठी कोणते फेशियल योग्य आहे? वाचा
Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 12 सप्टेंबर 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी
कुख्यात बंडू आंदेकरच्या घरात कोट्यवधींचे घबाड, खुनाच्या गुह्याचा तपास गुन्हे शाखेकडे
जीएसटी कमी करूनही दूध स्वस्त होणार नाही, आधीच कर शून्य असल्याचा कंपन्यांचा दावा