अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी

अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी

अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरीचे वेळापत्रक 11 ते 13 सप्टेंबर असे निश्चित करण्यात आले आहे. यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी मुदतवाढ मिळाली. या कालावधीत विद्यार्थ्यांनी नोंदणी करणे व कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेणे अपेक्षित असल्याचे माध्यमिक शिक्षण संचालक महेश पालकर यांनी सांगितले. बुधवारपर्यंत अकरावी प्रवेशासाठी अंतिम मुदत शिक्षण विभागाकडून देण्यात आली होती. मात्र केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी विशेष फेरीचे वेळापत्रक पुन्हा शिक्षण विभागाने जाहीर केले आहे.

राज्य मंडळाच्या पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी नवीन नोंदणी करता येईल. विद्यार्थ्यांना अर्जाचा भाग-1मध्ये दुरुस्ती, भाग-2 भरणे व प्राधान्यक्रम यादीनुसार किमान 1 ते कमाल 10 कनिष्ठ महाविद्यालयांची निवड करता येईल. 12 सप्टेंबर दुपारी 2पासून ते 13 सप्टेंबर सायंकाळी 6 वाजेपर्यंत विद्यार्थ्यांनी मिळालेल्या विद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करणे आवश्यक आहे.

बुधवारपर्यंत ‘ओपन टू ऑल’ अंतर्गत फेरीमध्ये एकूण 14 हजार 422 विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश निश्चित केला आहे, तर सीएपी फेरीत 13,326 प्रवेश निश्चित झाले असून विविध कोटय़ा अंतर्गत 1,096 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केल्याची माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक महेश पालकर यांनी दिली.

असे आहे वेळापत्रक

11 सप्टेंबर रोजी सकाळी 8 ते दुपारी 1 वाजेपर्यंत नवीन कनिष्ठ महाविद्यालयांनी नोंदणी करणे. कनिष्ठ महाविद्यालयांनी आपल्या कोटय़ातील जागा शासनाकडे समर्पित करणे. 11 सप्टेंबर दुपारी 1.30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत कनिष्ठ महाविद्यालयातील प्रवेश क्षमता वाढवणे. ही संधी अंतिम असून यानंतर सुविधा उपलब्ध होणार नसल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. 11 सप्टेंबर रात्री 8 ते 12 सप्टेंबर सकाळी 9 वाजेपर्यंत अकरावी प्रवेशासाठी नवीन विद्यार्थ्यांना नोंदणी करता येईल.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;