कुख्यात बंडू आंदेकरच्या घरात कोट्यवधींचे घबाड, खुनाच्या गुह्याचा तपास गुन्हे शाखेकडे
कुख्यात गुंड बंडू आंदेकर याच्या घर झडतीमध्ये पोलिसांना कोट्यवधी रुपयांचे घबाड मिळून आले आहे. त्यामध्ये 67 लाखांचे दागिने, चांदी, 2 लाख 50 हजारांची रोकड, आलिशान मोटार, करारनामे, टॅक्स पावत्यांचा समावेश आहे. तसेच त्याने केलेल्या जमीन व्यवहाराच्या काही इसार पावत्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत. दरम्यान आयुष कोमकर याच्या खुनाचा तपास आता गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.
गृह कलहातून गुंड बंडू आंदेकर याने कट रचून स्वतःच्याच नातवावर हल्लेखोरांकडून गोळीबार केला. त्याच्यावर पिस्तुलातून गोळ्यांचा वर्षाव करीत महाविद्यालयीन तरुण आयुष ऊर्फ गोविंद गणेश कोमकर (19, रा. नाना पेठ) याचा खून केला. ही घटना गणेश विसर्जन पूर्वसंध्येला नाना पेठेत घडली. त्यानंतर आंदेकर हा ट्रव्हलने प्रवास करत कुटुंबाला घेऊन देव दर्शनाला गेला होता. याप्रकरणी गुन्हे शाखेने 8 जणांना अटक केली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List