जीएसटी कमी करूनही दूध स्वस्त होणार नाही, आधीच कर शून्य असल्याचा कंपन्यांचा दावा
सरकारने सुमारे 400 वस्तूंवरील जीएसटी कमी केल्यानंतर पॅक केलेल्या दुधाच्या दरात 3 ते 4 रुपयांची कपात होऊ शकते असे सांगण्यात आले होते. परंतु, पॅक केलेल्या दुधावरील जीएसटी आधीच शून्य आहेत. त्यामुळे किमती कमी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असा दावा दूध कंपन्यांनी केला आहे.
अमूलने दुधाचे दर कमी होणार असल्याच्या वृत्ताचे खंडन केले आहे. ताज्या दुधाच्या किंमतीत कोणताही बदल प्रस्तावित नाही. पाउचमधील दुधावर कायमच शून्य जीएसटी आहे, अशी प्रतिक्रीया गुजरात सहकारी दूध विपणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक जयेन मेहता यांनी दिली. अल्ट्रा हाय टेम्परेचर म्हणजेच यूएचटी दुधावरील जीएसटी शून्यावर आणला आहे. त्यामुळे 22 सप्टेंबरपासून केवळ हेच दूध स्वस्त होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List