Mumbai News – क्षुल्लक वादातून बारबाहेरच टोळक्याकडून तरुणाची हत्या, मालाडमध्ये खळबळ
हॉटेल व्यावसायिकाशी झालेल्या क्षुल्लक कारणातून सहा जणांच्या टोळक्याने एका तरुणाची हत्या केल्याची घटना मालाडमध्ये घडली. कल्पेश भानुशाली असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. बुधवारी मध्यरात्री 1.30 ते 2.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी मालाड पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कल्पेश फास्ट फूडचा स्टॉल चालवायचा. बुधवारी मध्यरात्री कल्पेश गुरुकृपा बार अँड रेस्टॉरन्टमध्ये पार्सल घेण्यासाठी गेला असताना त्याचा हॉटेल व्यवस्थापकाशी वाद झाला. कल्पेश हॉटेल व्यवस्थापकाला शिवीगाळ करत होता. याचरदम्यान हॉटेलबाहेर सिगारेट ओढत उभ्या असलेल्या टोळक्याने या वादात मध्यस्थी केली. यानंतर कल्पेश आणि या टोळक्यात वाद झाला.
याच वादातून टोळक्याने कल्पेशच्या डोक्यात बिअरच्या बाटल्या फोडत, चाकूने वार केले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत गंभीर जखमी कल्पेशला रुग्णालयात दाखल नेले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी मालाड पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून एका आरोपीला अटक केली आहे. अन्य आरोपींची ओळख पटली असून त्यांचा शोध सुरू आहे. काही आरोपींचे गुन्हेगारी रेकॉर्ड आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List