कामगारांना पगारासोबत 50 हजार रुपये द्या!मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांना उच्च न्यायालयाचा दिलासा

कामगारांना पगारासोबत 50 हजार रुपये द्या!मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांना उच्च न्यायालयाचा दिलासा

मुंबई महापालिकेत वर्षानुवर्षे सेवा करणाऱया कर्मचाऱ्यांना कामावर कायमस्वरूपी केल्यानंतर त्यांचा पगार थकवणाऱया पालिकेला मुंबई उच्च न्यायालयाने फैलावर घेतले. प्रत्येक कामगाराला दोन महिन्यांचे थकीत वेतन द्या, त्यासोबत अतिरिक्त पन्नास हजार रुपये द्या असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने पालिकेला दिले. त्यामुळे 500 पेक्षा अधिक कर्मचाऱयांना दिलासा मिळाला आहे.

1996 सालापासून महापालिकेत नोकरी करणाऱया या कामगारांना सर्वोच्च न्यायालयाने कायमस्वरूपी नोकरी व आर्थिक लाभ देण्याचे आदेश महापालिकेला दिले होते. परंतु, पालिका प्रशासनाने या आदेशाची अंमलबजावणी न केल्याने या विरोधात कचरा वाहतूक कामगार संघटनेने हायकोर्टात याचिका दाखल केली. प्रशासनाने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी केली नसल्याचे याचिकाकर्त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. हायकोर्टाने 8 नोव्हेंबर 2023 रोजी निकाल देताना 580 कामगारांना कायमस्वरूपी व दोन महिन्यात थकीत वेतन देण्याचे औद्योगिक न्यायालयाचे आदेश कायम ठेवले. परंतु थकीत वेतन कर्मचाऱयांना न मिळाल्याने न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या एकलपीठाने दखल घेत पालिकेला फटकारले. तसेच, हा धक्कादायक प्रकार असल्याचे सांगत प्रशासनाला जाब विचारला.

पालिका म्हणते लवकरच वेतन देणार

पालिका प्रशासनाने 217 कर्मचाऱयांना कामावर कायम ठेवण्यात आल्याबाबत पत्रे दिली. परंतु 363 कर्मचाऱयांना ही पत्रे देण्यात आली नाहीत. इतकेच काय तर 77 कर्मचाऱ्यांचे निधन झाल्याचे याचिकाकर्त्यांनी न्यायालयाच्या लक्षात आणून दिले. त्यावर पालिकेने प्रतिज्ञापत्र दाखल करत थकीत वेतन लवकरच देण्यात येईल, असे आश्वासन दिले व मृत्युमुखी पडलेल्या 77 कर्मचाऱयांचे वारस त्यांच्या थकीत देयकांवर दावा करू शकतात असे न्यायालयाला सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरीचे वेळापत्रक 11 ते 13 सप्टेंबर असे निश्चित करण्यात आले आहे. यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी मुदतवाढ मिळाली....
कुख्यात बंडू आंदेकरच्या घरात कोट्यवधींचे घबाड, खुनाच्या गुह्याचा तपास गुन्हे शाखेकडे
जीएसटी कमी करूनही दूध स्वस्त होणार नाही, आधीच कर शून्य असल्याचा कंपन्यांचा दावा
‘टीईटी’संबंधी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे शिक्षक चिंताग्रस्त, परीक्षा उत्तीर्ण होण्याच्या सक्तीमधून सूट देण्याची मागणी
रमेश गायचोरच्या जामीनप्रकरणी अधीक्षकांचा माफीनामा, न्यायालयाच्या दणक्यानंतर तुरुंग प्रशासन वठणीवर
मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्र्यांचे पंख कापले; सहपालकमंत्र्यांना तक्रारी सोडवण्याचे अधिकार, अठरा महिन्यानंतर सोपवली जबाबदारी
गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार