सरकारने काढलेल्या GR मधून कुणालाही सरसकट आरक्षण मिळणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितले

सरकारने काढलेल्या GR मधून कुणालाही सरसकट आरक्षण मिळणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितले

मनोज जरांगे-पाटील यांच्या आमरण उपोषण आंदोलनानंतर सरकारने मराठा आरक्षणाबाबतचे जीआर मंगळवारी काढले. त्यानंतर जरांगे पाटील यांनी त्यांचे उपोषण मागे घेतले. त्यानंतर सरकारने या जीआरमधून मराठ्यांची फसवणूक केल्याचे बोलले जात होते. या जीआरमध्ये मराठ्यांना ना सरसकट आरक्षण व ना सगे सोयऱ्यांचा उल्लेख. त्यामुळे सरकारकडून फसवले गेल्याची चर्चा होती. आता यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच शिक्कामोर्तब केले आहे. ‘सरकारने काढलेल्या GR मधून कुणालाही सरसकट आरक्षण मिळणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले आहे.

सरकारने जो जीआर काढलेला आहे तो विचारपूर्वक काढलेला आहे. तो कायदेशीर आहे. हा जीआर कुठेही ओबीसी समाजावर अन्याय करत नाही. हा जीआर कुणालाही सरकार आरक्षण देत नाही. ज्यांच्याकडे पुरावा आहे जे खरे पुराव्याने कुणबी आहेत त्यांनाच सर्टिफिकेट मिळायला मदत करतो. त्यामुळे कोर्टातही राज्य शासनाच्या वतीने योग्य भूमिका मांडू. मी पुन्हा एकदा ओबीसी नेत्यांना सांगतोय की जीआर नीट वाचा. कुठेही सरसकट कुणालाहाी आरक्षण दिलेलं नाही. कायद्याने पुराव्यानिशी जे लोकं अर्ज करतील. तो पुरावा तपासून तो योग्य असतील तरच त्यांना आरक्षण मिळेल.”, असे फडणवीस म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;