तरुणीने विनवण्या करुनही प्रियकर ऐकला नाही, धावत्या ट्रेनमधील तरुणाचे कृत्य व्हायरल
प्रेमी जोडप्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. धावत्या ट्रेनमध्येच प्रेयसीच्या भांगेत सिंदूर भरून प्रियकराने तिच्याशी लग्न केल्याचा व्हिडिओ सध्या चर्चेत आहे. इन्स्टाग्रामवर @asli.shubhh या अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर युजर्सकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत.
इंटरनेटवर हा व्हिडिओ व्हायरल होत असन 24 सेकंदाच्या या व्हिडिओत एक प्रेमी युगुल एसी बोगीच्या साईड लोअर बर्थवर बसलेले दिसत आहे. तरुणी प्रियकराला वारंवार सांगत आहे की, तिचे वडील या नात्याच्या विरोधात आहेत. ते कधीच या नात्याला संमती देणार नाहीत. मात्र मुलाचे मित्र तरुणीवर लग्नासाठी दबाव टाकत आहेत.
व्हिडिओ रेकॉर्ड करणारा व्यक्ती दोघांनाही ते खूश आहेत का असे विचारतो. यावर दोघेही हो असे उत्तर देतात. यानंतर प्रियकर त्याच्या सीटवरून उठतो आणि मुलीच्या भांगेत सिंदूर भरतो. व्हिडिओ व्हायरल सोशल मीडियावर व्हायरल झाला असून कॅप्शनेमध्ये युजरने छान मनोरंजन झाले असे लिहिले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List