न्यायालयीन कक्षाचा हुबेहूब देखावा, कोल्हापुरातील अॅड.नितीन बाडकर कुटुंबियांचा लक्षवेधी गणेशोत्सव
कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांसाठी तब्बल 40 ते 45 वर्षांच्या प्रदीर्घ लोकलढ्यानंतर कोल्हापुरात नुकतेच 17 ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते मोठ्या दिमाखात मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंचचे लोकार्पण झाले. दिड आठवडे झाले या सर्किट बेंचमधून प्रत्यक्ष न्यायदानासही सुरुवात झाली आहे. न्यायालयाप्रती जनभावनाही यानिमित्ताने अधोरेखित झाली. यंदाच्या गणेशोत्सवात याची प्रचिती दिसून येत आहे.
राजारामपुरी येथील रहिवासी आणि व्यवसायाने वकील असलेले नितीन बाडकर आणि त्यांच्या कुटुंबीयांनी यंदा केलेली घरगुती गणेश सजावट सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. चक्क न्यायालयीन कक्षाचाच हुबेहूब देखावा सादर करण्यात आला आहे. नुकतेच कायद्याचे शिक्षण घेऊन, वकिली व्यवसाय सुरू केलेल्या बाडकर यांच्या कन्या अॅड. निकिता आणि चिरंजीव वरद यांनी यासाठी विशेष परिश्रम घेतले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List