पितृ पंधरवड्यात भाज्यांच्या दर आवाक्यात
पितृ पंधरवड्यात भाज्यांच्या मागणीत वाढून दरात मोठी वाढ होत असते. यंदा मात्र, पावसाने उघडीप दिल्याने सर्व प्रकारच्या भाज्यांची बाजारात मुबलक आवक होत आहे. त्यामुळे पितृ पंधरवड्यात भाज्या स्वस्त झाल्या आहेत.
यंदा पुणे विभागातील पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्याने भाज्यांची लागवड मोठ्या प्रमाणावर झाली. आठवडभरापासून पावसाने उघडीप दिली असून, सर्व प्रकारच्या भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणावर होत आहे. पुण्यातील श्री छत्रपती शिवाजी मार्वेâटयार्डात पुणे, नाशिक विभागातून मोठ्या प्रमाणावर भाज्यांची आवक होत आहे. पितृ पंधरवड्यात भाज्यांची आवक वाढल्याने दरात घट झाली आहे, अशी माहिती मार्वेâटयार्डातील ज्येष्ठ अडतदार विलास भुजबळ यांनी दिली.
किरकोळ भाजीपाला व्यापारी प्रकाश ढमढेरे म्हणाले, पितृ पंधरवड्यात भेंडी, गवार, लाल भोपळा, कारली, देठ, आळुची पाने, मेथी या भाज्यांना मागणी असते. यंदा पितरांना नैवेद्य अर्पण करण्यासाठी लागणार्या सर्व भाज्यांची आवक बाजारात मोठ्या प्रमाणावर होत असल्याने पितृ पंधरवड्यात भाज्यांच्या दरात २० ते ३० टक्क्यांनी घट झाली आहे. पितृ पंधरवड्यानंतर नवरात्रोैत्सवाचा प्रारंभ होतो. नवरात्रौत्सवात अने्कजण उपवास करतात. उपवासासाठी भेंडी, राजगिरा या भाज्यांना मागणी असते. इतर भाज्यांना नवरात्रौत्सवात फारशी मागणी नसते.
भाज्यांचे किलोचे दर
गवार – १०० ते १४० रुपये
गावरान गवार – १८० ते २०० रुपये
भेंडी – ८० ते १०० रुपये
कारली – ८० ते १०० रुपये
देठ (जुडी) – २० ते ३० रुपये
आळुची पाने (जुडी) – १० ते १५ रुपये
मेथी (जुडी) -२० ते २५ रुपये
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List