Asia Cup 2025 – UAE ला चकवा देणाऱ्या खेळाडूचा सन्मान, गोलंदाजी प्रशिक्षकाने दिला Impact Player Of The Match चा पुरस्कार
टीम इंडियाच्या यंग ब्रिगेडने Asia Cup 2025 ची रुबाबात, थाटात आणि धुमधडाक्यात सुरुवात केली. पहिल्याच सामन्यात UAE चा टीम इंडियाने धुव्वा उडवून दिला आणि 9 विकेटने सामना जिंकला. या सामन्यात UAE ची भंबेरी उडालेली पाहायला मिळाली. कुलदीपने यादवने त्यांना आपल्या फिरकीच्या तालावर नाचवलचं परंतु शिवम दुबेनेही त्यांना चांगला चकवा दिला. अष्टपैलू शिवमने महत्त्वपूर्ण तीन विकेट घेत संघाच्या विजयात मोलाची कामगिरी केली. त्यामुळे त्याला गोलंदाजी प्रशिक्षक मोर्ने मोर्केलच्या हस्ते ड्रेसिंग रूमध्ये ‘इम्पॅक्ट प्लेअर ऑफ द मॅच’चा पुरस्कार देण्यात आला.
BCCI ने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये शिवम दुबेने आपल्या भावना व्यक्त करत गोलंदाजी प्रशिक्षक मोर्ने मॉर्केलचे आभार मानले आहेत. तो म्हणाला की, “मला आज गोलंदाजी करायला मजा आली. मी मेहनत केली होती म्हणून मला ही संधी मिळाली.” असं म्हणत त्याने मोर्ने मॉर्केलचे आभार मानले. UAE विरुद्धच्या सामन्यात शिवम दुबे आणि कुलदीप यादवने जबरस्त खेळाचं प्रदर्शन केलं. दोघांनी मिळून UAE चे 7 फलंदाजू तंबूत धाडले. त्यामुळे त्यांना 60 धावाही करता आल्या नाहीत. त्यानंतर टीम इंडियाने आक्रमक फलंदाजी करत 1 विकेट गमावत हे माफक आव्हान अगदी थाटात पूर्ण केलं आणि 9 विकेटने सामना जिंकला. शिवम दुबेच्या या धमाकेदार खेळीमुळे त्याला ड्रेसिंग रुममध्ये Impact Player Of The Match चा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
|
Smiles and banter all around in the #TeamIndia dressing room after a commanding win against the UAE
Watch #AsiaCup2025 | #INDvUAEhttps://t.co/eRYLdVyGdx
— BCCI (@BCCI) September 11, 2025
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List