मुख्य न्यायमूर्ती आराधे, न्या. पांचोली यांची अखेर सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती

मुख्य न्यायमूर्ती आराधे, न्या. पांचोली यांची अखेर सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती

मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे आणि पाटणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती विपुल पांचोली यांची अखेर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. न्यायवृंदाने (कॉ लेजियम) बढतीची शिफारस केल्यानंतर दोन दिवसांनी केंद्र ससकारने ही नियुक्ती आज जाहीर केली.

या नियुक्तीची माहिती केंद्रीय कायदामंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी ‘एक्स’च्या माध्यमातून दिली आहे. संविधानाने दिलेल्या अधिकाराचा वापर करत राष्ट्रपती आणि सरन्यायाधांनी सल्लामसलत केल्यानंतर आलोक आराधे व विपुल मनुभाई पांचोली यांची सर्वोच्च न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती केल्याचे मेघवाल यांनी म्हटले आहे.

प्रादेशिक असमतोल; पांचोली यांच्या नियुक्तीला न्या. नागरत्न यांचा आक्षेप

न्यायमूर्ती पांचोली यांच्या नियुक्तीला न्यायवृंदाने एकमताने सहमती दर्शवली नव्हती. सरन्यायाधीश भूषण गवई हे अध्यक्ष असलेल्या पाच सदस्यांच्या न्यायवृंदातील न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्न यांनी पांचोली यांच्या नियुक्तीला आक्षेप घेतला आणि विरोध करण्यासाठी त्यांनी पत्रही लिहिले होते. पांचोली यांच्या नियुक्तीमुळे ज्येष्ठता आणि प्रादेशिक प्रतिनिधीत्वात असमतोल होत असल्याचे न्या. नागरत्न यांनी पत्रात म्हटले होते. दरम्यान, पांचोली यांच्या नियुक्तींमुळे गुजरात उच्च न्यायालयातून सुप्रीम कोर्टात आलेल्या न्यायमूर्तीची संख्या तीन झाली आहे.

कोण आहेत न्या. पांचोली?

गुजरात येथे जन्मलेले न्यायमूर्ती विपुल पांचोली यांनी १९९१ मध्ये वकिलीच्या कारकिर्दीला सुरुवात केली. गुजरात उच्च न्यायालयात अनेक वर्षे वकिली केल्यानंतर २०१४ मध्ये त्यांची उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाली. २०१६ मध्ये ते कायमस्वरूपी न्यायमूर्ती झाले. सध्या ते पाटणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;