सीपी राधाकृष्णन यांनी दिला महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा राजीनामा, गुजरातच्या राज्यपालांकडे अतिरिक्त कारभार
सीपी राधाकृष्णन यांची देशाच्या उपराष्ट्रपती पदी निवड झाली असून त्यांनी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे महाराष्ट्राचा अतिरिक्त कारभार देण्यात आला आहे. राष्ट्रपती भवनाने पत्रक काढत याबाबत माहिती दिली आहे.
9 सप्टेंबर रोजी झालेल्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून कार्यरत असलेले सीपी राधाकृष्णन यांनी विजय मिळवला. उपराष्ट्रपती पदी निवड झाल्यानंतर त्यांनी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा राजीनामा दिला. नवीन राज्यपालांची नियुक्ती होईपर्यंत महाराष्ट्राचा कारभार गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रेत यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
Acharya Devvrat, Governor of Gujarat, to discharge the functions of the Governor of Maharashtra, in addition to his own duties as Vice President-elect, C. P. Radhakrishnan demits the office of Governor of Maharashtra. pic.twitter.com/nP8IeYhrVm
— ANI (@ANI) September 11, 2025
गुजरातचे राज्यपाल म्हणून नियुक्त होण्याआधी देवव्रत यांनी 2015 ते 2019 या काळात हिमाचल प्रदेशचे राज्यपालपदही भूषवले होते. जुलै 2019 मध्ये त्यांनी गुजरातचे राज्यपाल म्हणून काम सुरू होते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List