काठमांडूला जाणाऱ्या स्पाईटजेटच्या विमानात आगीची शंका, दिल्ली विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग
दिल्लीहून काठमांडूला जाणाऱ्या स्पाईटजेटच्या विमानाच्या टेलपाईपमध्ये आग लागल्याची शंका असल्याने विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. विमानतळावर उतरताच विमानाची तांत्रिक तपासणी करण्यात आली. या तपासणीत कोणतीही समस्या आढळून आली नाही. या घटनेमुळे चार तास उशिराने विमानाचे उड्डाण झाले. तथापि, विमानात किती प्रवासी होते याची माहिती मिळू शकली नाही.
दिल्ली विमानतळावरून गुरूवारी सकाळी स्पाईटजेटच्या विमानाने नियोजित वेळेत उड्डाण केले. मात्र रनवेवर उभ्या असलेल्या विमानाने स्पाईटजेटच्या टेलपाईपमध्ये आग लागल्याचा संशय व्यक्त केला. विमानाच्या कॉकपीटमध्ये आग लागल्याचा कोणताही संकेत मिळाला नाही. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव विमान पुन्हा दिल्ली विमानतळावर परतण्याचा निर्णय वैमानिकांनी घेतला. विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग केल्यानंतर तांत्रिक तपासणीसाठी विमान ‘बे’मध्ये परत आणण्यात आले.
एअरलाईन कंपनीने एका निवेदनात जारी केले आहे. टेलपाइप हा इंजिनचा एक्झॉस्ट पाईप आहे. त्यात आग लागल्याची शंका होती. यानंतर, विमानाची तांत्रिक तपासणी करण्यात आली. मात्र तपासणीत कोणतीही समस्या आढळली नाही. तपासणी पूर्ण झाल्यानंतर, विमानाला ऑपरेशनसाठी ग्रीन सिग्नल देण्यात आला, असे एअरलाईन कंपनीने निवेदनात म्हटले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List