आम आदमी पार्टीचे राज्यसभा खासदार संजय सिंह ‘हाऊस अरेस्ट’, जम्मू-कश्मीर पोलिसांच्या कारवाईनं राजकीय वर्तुळात खळबळ
आम आदमी पार्टीचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांना जम्मू-कश्मीरमध्ये नजरकैद करण्यात आले आहे. आपचे आमदार मेहराज मलिक यांच्या अटकेविरोधात निदर्शने करण्यासाठी ते जम्मू-कश्मीरला पोहोचले होते. मात्र त्यांना जम्मू-कश्मीर पोलिसांनी नजरकैद केल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
डोडा मतदारसंघाचे आमदार मेहराज मलिक यांना अटक करण्यात आल्यानंतर आम आदमी पार्टी आक्रमक झाली आहे. या पार्श्वभूमीवर खासदार संजय सिंह जम्मू-कश्मीरमध्ये पोहोचले होते. आपकडून सुरू असलेल्या निदर्शनात ते सहभागी होणार होते आणि त्यानंतर पत्रकार परिषद घेणार होते. मात्र तत्पूर्वीच त्यांना सरकारी गेस्ट हाऊसमध्ये नजरकैद करण्यात आले.
मी सध्या श्रीनगरमध्ये असून हुकूमशाही शिगेला पोहोचली आहे. लोकशाहीत आपल्या हक्कांसाठी आवाज उठवणे आणि निषेध करणे घटनात्मक अधिकार आहे. आज श्रीनगरमध्ये मेहराज मलिक यांच्या बेकायदेशीर अटकेविरोधात पत्रकार परिषद आणि ठिय्या आंदोलन होणार होते. परंतु सरकारी गेस्ट हाऊसचे रुपांतर पोलिसांनी छावणीमध्ये करण्यात आले असून मला, आमदार इमरान हुसैन आणि माझ्या इतर सहकाऱ्यांना गेस्ट हाऊसमधून बाहेर पडण्यास मज्जाव घालण्यात आला आहे, अशी पोस्ट करत खासदार संजय सिंह यांनी आपल्याला नजरकैद करण्यात आल्याची माहिती दिली.
तानाशाही चरम पर है मैं इस वक़्त श्रीनगर में हूँ।
लोकतंत्र में हक़ के लिए आवाज़ उठाना आंदोलन करना हमारा संवैधानिक अधिकार है।
आज @MehrajMalikAAP की अवैध गिरफ़्तारी के ख़िलाफ़ श्रीनगर में प्रेस कांफ्रेंस और धरना था लेकिन सरकारी गेस्ट हाउस को पुलिस छावनी बना दिया गया है।
मुझे… pic.twitter.com/0rVDXht6UB— Sanjay Singh AAP (@SanjayAzadSln) September 11, 2025
संजय सिंह यांना नजरकैद करण्यात आल्यानंतर जम्मू-कश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांनी तात्काळ सरकारी गेस्ट हाऊसमध्ये धाव घेतली. मात्र पोलिसांनी त्यांनाही आपली भेट घेऊ दिली नाही. ही हुकूमशाही नाही तर काय? असा सवाल संजय सिंह यांनी अन्य एका ट्विटद्वारे केला. यासोबत त्यांनी एक व्हिडीओही शेअर केला असून यात गेटबाहेर फारूख अब्दुल्ला उभे असल्याचे दिसत आहेत.
बहुत दुःख की बात है जम्मू कश्मीर के कई बार मुख्यमंत्री रहे डॉक्टर फारूख अब्दुल्ला जी पुलिस द्वारा मुझे हाउस अरेस्ट किए जाने की ख़बर पाकर मुझसे मिलने सरकारी गेस्ट में आये उन्हें मिलने नहीं दिया गया।
ये तानाशाही नहीं तो और क्या है? pic.twitter.com/MOcNb1heE6— Sanjay Singh AAP (@SanjayAzadSln) September 11, 2025
नेमकं प्रकरण काय?
आपचे जम्मू-कश्मीरमधील आमदार मेहरान मलिक यांना 8 सप्टेंबर रोजी सार्वजनिक ठिकाणी नियम भंग केल्याप्रकरणी पीएसए कायद्यांतर्गत अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना कठुआ येथील तुरुंगात बंद करण्यात आले. त्यांच्या अटकेला चार दिवस झाले असून याविरोधात आम आदमी पार्टीची निदर्शने सुरू आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List