रत्नागिरी तिहेरी हत्याकांड प्रकरण, दुर्वास पाटीलसह दोघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी
रत्नागिरी तालुक्यातील वाटद-खंडाळा येथे नुकत्याच उघड झालेल्या तिहेरी हत्याकांड प्रकरणात तीन संशयितांना न्यायालयाने गुरुवारी न्यायालयीन कोठडी सुनावली. दुर्वास दर्शन पाटील (25), विश्वास विजय पवार (41) आणि सुशांत शांताराम नरळकर (40) अशी आरोपींची नावे आहे.
मिरजोळे येथील भक्ती मयेकर या तरुणीच्या हत्येचा उलगडा झाल्यानंतर एका पाठोपाठ एक तीन हत्या झाल्याचे निष्पन्न झाले. तिहेरी हत्याकांड उघडकीस येताच संपूर्ण जिल्हा खळबळ उडाली. भक्ती मयेकर हिची हत्या करून तिचा मृतदेह आंबा घाटात फेकला होता. या हत्येचा उलगडा झाल्यानंतर दुर्वास पाटीलने भक्ती मयेकर हिच्यासह अन्य दोघांची हत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले. तिघांपैकी एकाचा मृतदेह अद्यापही आढळून आलेला नाही. आपल्या तीन साथीदारांच्या मदतीने दुर्वास पाटील याने तीनही मृतदेहांची विल्हेवाट लावल्याचे समोर आले.
अटक करण्यात आलेल्या चारपैकी दुर्वास पाटील, सुशांत नरळकर, विश्वास पवार यांच्या वाढीव पोलीस कोठडीची मुदत संपल्याने गुरुवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. या हत्याकांडमधील चौथा संशयित निलेश भिंगार्डे याला यापूर्वीच न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List