वर्धा नदीची पाणीपातळी वाढल्याने गडचांदूर-भोयेगाव मार्ग बंद; इरई धरणाचे तीन दरवाजे उघडले
वर्धा नदीला पूर आल्याने चंद्रपुरातून कोरपनाकडे जाणारा गडचांदूर भोयेगाव मार्ग बंद झाला. मार्ग बंद होण्याची ही सहावी वेळ आहे. पश्चिम विदर्भात मुसळधार पाऊस पडल्याने वर्धा नदीच्या पाण्यात वाढ झाल्याने गडचांदूर भोयेगाव मार्ग बंद झाला. या मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. चंद्रपुरातील इरई धरणाचे तीन दरवाजे ०.२५ मीटरने उघडण्यात आल्याने नदी काठावरील गावांना पुराचा फटका बसण्याची शक्यता वाढली असताना शेती पाण्याखाली येण्याचे संकट अधिक गडद झाले आहे. प्रशासनाकडून नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List