निफाडमधला सहकारी साखर कारखाना सुरु करा, संजय राऊत यांचे केंद्रीय मंत्री अमित शहा यांना पत्र

निफाडमधला सहकारी साखर कारखाना सुरु करा, संजय राऊत यांचे केंद्रीय मंत्री अमित शहा यांना पत्र

नाशिक जिल्ह्यातील निफाड येथील निफाड सहकारी साखर कारखाना 2013-14 च्या गळीत हंगामापासून बंद आहे. या कारखान्याताली कामगारांचे वेतन थकले आहेत, या कारखान्यात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला आहे, त्यामुळे हा कारखाना सुरु करा अशी मागणी करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांना पत्र लिहिले आहे.

संजय राऊत यांनी पत्रात म्हटलंय की, नाशिक जिल्ह्यातील निफाड येथील निफाड सहकारी साखर कारखाना 2013-14 च्या गळीत हंगामापासून बंद आहे. आर्थिक अनागोंदी व संचालकांच्या भ्रष्टाचारामुळे सहकारी तत्त्वावरील हा जुना कारखाना बंद पडला आहे. नाशिक जिल्हा बँकेची थकबाकी असल्याने बँकेने कारखाना मे.बी.टी. कडलग कन्स्ट्रक्शन प्रा.लि., नाशिक यांना 25 वर्षे मुदतीने भाडेतत्त्वावर चालविण्यास दिला. तरीही हा कारखाना मे. कडलग कन्स्ट्रक्शनने अद्यापि सुरू केला नाही. कारखान्यातील कामगार व त्यांच्यावर असलेल्या कुटुंबाच्या जगण्या-मरण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. कामगारांची ग्रॅच्युईटी, वेतन, पगार थकले आहेत. ही थकबाकी कायम असताना, कामगार वर्ग न्यायासाठी संघर्ष करीत असताना नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कारखाना विक्रीचा घाट घातला आहे. यात फार मोठा गैरव्यवहार सुरू आहे असे संजय राऊत यांनी पत्रात म्हटले आहे.

तसेच निफाड सहकारी साखर कारखान्याच्या विक्रीत स्थानिक राजकीय पुढाऱ्यांना कमालीचा रस आहे. या कारखान्यातील भंगार परस्पर विकून 25 ते 30 कोटींचा अपहार झाला पण आतापर्यंत कामगारांना त्यांचे थकीत वेतन मिळू शकले नाही. केंद्रीय सहकार मंत्रालयाने कठोर पावले उचलली तर हा कारखाना पुन्हा सुरु होईल व असंख्य लोकांच्या विझलेल्या चुली पेटतील. आपण स्वतः लक्ष घालून हा निफाड कारखाना पुन्हा सुरु करावा ही समस्त कामगारांची मागणी आहे.

निफाड साखर कामगार सभेतर्फे कामगारांचे प्रश्न मांडणारे निवेदन आपल्या माहितीसाठी सोबत जोडले आहे. आपण याबाबत लक्ष घालून कामगारांना न्याय द्यावा. कामगारांच्या प्रतिनिधींना दिल्लीत चर्चेसाठी बोलावल्यास बरे होईल असेही संजय राऊत यांनी पत्रात नमूद केले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;