मागणीविनाच पंचनाम्यांचे आदेश – मुख्यमंत्री
पावसामुळे राज्यातील 14 लाख एकर जमिनीवरील पिके नष्ट झाली आहेत. त्याचे पंचनामे करावेत, असे आदेश दिलेले आहेत. पंचनामे झाल्याशिवाय नुकसानभरपाई देता येत नाही, कोणतीही मागणी न होतासुद्धा हे आदेश देण्यात आले आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
राज्यातील पावसामुळे निर्माण झालेल्या आपत्तीसंदर्भात फडणवीस म्हणाले, जिथे नद्यांची पातळी धोक्याचा इशारा देण्याच्या वर गेली, तिथे धरणांमधून विसर्ग करत पाण्याचे व्यवस्थापन सुरू आहे. अन्य काही राज्यांबरोबर चर्चा सुरू असून त्यांचेही चांगले सहकार्य मिळत आहे.
z सिडकोतील जमीन घोटाळ्याबाबत रोहित पवार बोलतात, मात्र ही सगळीच मंडळी रोजच वेगवेगळे आरोप करतात, पुरावे कशाचेच देत नाहीत. विनापुराव्याचे आरोप करण्यात काही अर्थ नाही. सिडकोमधील प्रकरण काय हे तेच मला माहिती नाही, असे फडणवीस म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List