ओबीसी घटकाचे नुकसान होत असेल तर न्यायालयात दाद मागणार – छगन भुजबळ
मराठा समाजाला कुणबी दाखले देण्यासंदर्भात सरकारने जो शासन निर्णय जारी केला आहे. त्याबद्दल आणि त्या शासन निर्णयामध्ये लिहिलेल्या काही वाक्य, काही शब्दाबद्दल संभ्रम आहेत. यासाठी आम्ही जेष्ठ विधीज्ञांशी चर्चा करत आहोत. सध्या सुरू असलेला गणेशोत्सव पाहता आपल्या आंदोलनामुळे कुठेही कायदा व्यवस्था बिघडू नये यासाठी ओबीसी समाजाने आंदोलने अथवा उपोषणे स्थगित करावीत, असे आवाहन राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.
मुंबई येथे पत्रकारांशी संवाद साधताना छगन भुजबळ म्हणाले की, माझे ओबीसी बांधवांना आव्हान आहे की सरकारने काढलेल्या शासन निर्णयाच्या बाबतीत आम्ही वकिलांशी सविस्तर चर्चा करत आहोत. या निर्णयामुळे ओबीसी घटकाचे नुकसान होते आहे असे मत जर विधीज्ञानी व्यक्त केले तर निश्चितपणे मोठी आंदोलने आपण उभारू. या शासनाने काढलेल्या शासन निर्णया मध्ये ओबीसी घटकाचे नुकसान होत असेल तर या विरुद्ध न्यायालयात देखील दाद मागू .
आज राज्यामध्ये विविध ठिकाणी ओबीसी संघटनांनी निदर्शने नोंदवली, आणि ठिकाणी या शासन निर्णयाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. या सर्व भावना लक्षात घेऊन आणि विधीज्ञांशी चर्चा झाल्यानंतर यातून योग्य असा मार्ग आपण निश्चितपणे काढू, असे देशील ते म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List