Ratnagiri News – अंमली पदार्थाविरोधात जिल्हाधिकाऱ्यांचे कार्यवाहीचे निर्देश

Ratnagiri News – अंमली पदार्थाविरोधात जिल्हाधिकाऱ्यांचे कार्यवाहीचे निर्देश

पोलीस, उत्पादन शुल्क, कोस्टगार्ड आणि अन्न औषध प्रशासन विभाग यांनी समन्वयाने अंमली पदार्थविरोधी तपासणीची कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिले. नार्को कोओर्डीनेशन यंत्रणेच्या जिल्हास्तरीय समितीची बैठक बुधवारी पार पडली.

बैठकीला अप्पर पोलीस अधीक्षक बाबुराव महामुनी, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजयसिंह जाधव पोलीस निरीक्षक नितीन ढेरे आदी उपस्थित होते. मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, उत्पादन शुल्क अधिक्षक कीर्ती शेडगे यांच्यासह क्षेत्रीय स्तरावरील उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

पोलीस निरीक्षक ढेरे यांनी 7 जुलैपासून अंमली पदार्थविरोधी केलेल्या कार्यवाहीबाबत माहिती दिली. एकूण 9 गुन्ह्यांमध्ये 11 ग्रॅम ब्राऊन हेरॉईन, 4.713.5 कि.ग्रॅ. गांजा असा एकूण 3 लाख 59 हजार 900 रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केला. यात 15 आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे.

उत्पादन शुल्क विभागाने अवैध मद्याबाबत निवडणूक कालावधीत जशी चांगली कामगिरी केली आहे, तशी कामगिरी अंमली पदार्थाविरोधातही करावी. शाळा, महाविद्यालयांमध्ये देखील जनजागृती करण्यावर जिल्हा परिषदेने भर द्यावा. कोस्टगार्ड, पोलीस, अन्न व औषध प्रशासन अशा सर्वच विभागांनी सतर्क राहून एकमेकांच्या समन्वयाने, कधी संयुक्तरित्या अंमली पदार्थविरोधात जोरदार तपासणी मोहीम राबवून कार्यवाही करावी, असे जिल्हाधिकारी सिंह म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;