शाहरुख-राणी पुन्हा एकत्र
अभिनेता शाहरुख खान आणि राणी मुखर्जी यांची जोडी स्क्रीनवर खूप गाजली. ‘कुछ कुछ होता है’, ‘चलते चलते’, ‘कभी अलविदा ना कहना’ या सिनेमांमध्ये दोघांची केमिस्ट्री दिसली. दोघांना 33 वर्षांच्या करिअरमध्ये पहिल्यांदाच राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला. राष्ट्रीय पुरस्कार घोषित झाल्यानंतर पहिल्यांदाच दोघं एकमेकांना भेटले. नुकताच शाहरुखने सोशल मीडियावर राणीसोबत एक रील शेअर केले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
किंग खान आकाशी रंगाच्या स्वेटशर्टमध्ये दिसत आहे. तसेच त्याने कानटोपीही घातली आहे. तर राणी मुखर्जी पांढऱ्या शर्टमध्ये कॅज्युअल लूकमध्ये दिसत आहे. शाहरुखचा मुलगा आर्यन खानच्या आगामी ‘बॅड्स ऑफ बॉलीवूड’ सीरिजमधील गाण्यावर त्यांनी हे रील शेअर केलं आहे. हे रिल चाहत्यांना खूप आवडताना दिसत आहे. राणी आणि किंग एकाच फ्रेममध्ये असे म्हणत नेटिजन्स दोघांचे कौतुक करत आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List