आयटीआरसाठी उरले फक्त 13 दिवस
इन्कम टॅक्स रिटर्न (आयटीआर) फाईल करण्यासाठी आता केवळ 13 दिवस उरले आहेत. करदात्यांना 15 सप्टेंबरपर्यंत आयटीआर करण्याची डेडलाईन आहे. त्यामुळे ज्या करदात्यांनी अद्याप आयटीआर फाईल केली नसेल त्यांनी लवकरात लवकर करणे गरजेचे आहे. 25 ऑगस्टपर्यंत 3.68 कोटी आयटीआर दाखल करण्यात आले आहेत. ज्यात 3.54 कोटी व्हेरिफाई 2.30 कोटी प्रोसेसमध्ये आहेत. गेल्या वर्षभरात 9 कोटींहून अधिक करदात्यांनी आयटीआर फाईल केली होती. आयटीआर दाखल करण्याची तारीख आधी 31 जुलैपर्यंत होती. परंतु, नंतर ही तारीख वाढवून 15 सप्टेंबरपर्यंत करण्यात आली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List